Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रवसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याची ३१ डिसेंबर अखेरची ऊस बिले जमा.🛑जनता बँक...

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याची ३१ डिसेंबर अखेरची ऊस बिले जमा.🛑जनता बँक आजरा – सलग सातवा बँको ब्ल्यु रिबन सर्वोत्कृष्ट बँक अॅवार्ड प्रधान.

🛑वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याची ३१ डिसेंबर अखेरची ऊस बिले जमा.
🛑जनता बँक आजरा – सलग सातवा बँको ब्ल्यु रिबन सर्वोत्कृष्ट बँक अॅवार्ड प्रधान.

आजरा.- प्रतिनिधी.

🛑वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याची ३१ डिसेंबर अखेरची ऊस बिले जमा.

वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चालू हंगामात आजअखेर ७४ दिवसात २३०००० मे. टन ऊसाचे गाळप झाले असुन कारखान्याकडे दि.१६/१२/२०२४ ते ३१/१२/२०२४ अखेर गाळप झालेल्या ऊसाची बिले प्रतिटन रू.३१००/- प्रमाणे रु.१५ कोटी ३६ लाख विनाकपात ऊस पुरवठादार शेतक-यांच्या सेव्हींग खातेवरती जमा करण्यात आली आहेत. तरी संबंधित ऊस पुरवठादार शेतकरी यांनी आपल्या बँकेशी संपर्क साधून बिलाची रक्कम उचल करावी अशी माहिती कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे यांनी दिली.

हंगाम २०२४/२५ मध्ये करखाना व्यवस्थापनाने ठेवलेल्या उददीष्टा प्रमाणे गाळपाचे नियोजन केले असुन सद्या येत असलेल्या ऊसाचे गाळप करून हंगाम यशस्वी करणेचा प्रयत्न करीत आहोत. कारखान्याकडे उपलब्ध असलेल्या बीड व स्थानिक तोडणी-वाहतुक यंत्रणा कार्यक्षेत्रात लावुन प्राधान्याने ऊसाची उचल करणेचे नियोजन सुरू आहे. कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफसाहेब, वैद्यकिय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखान्याकडे गाळपास येणा-या संपुर्ण ऊसाची बिले नियमितपणे आदा करणेचे नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे. तरी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस अन्य कारखान्यांना न घालता थोडे थांबुन व्यवस्थापनास सहकार्य करावे व आपला संपुर्ण ऊस आजरा कारखान्यास गाळपास पाठवावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे यांनी संचालक मंडळाच्या वतीने केले.

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन मधुकर देसाई, जिल्हा बँकेचे संचालक तथा बैंक प्रतिनिधी सुधीर देसाई, कारखानचे संचालक विष्णू केसरकर, उदयसिंह पोवार, मुकुंदराव देसाई, मारूती घोरपडे, सुभाष देसाई,अनिल फडके, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे), शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरुकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, संचालक काशिनाथ तेली, संभाजी दत्तात्रय पाटील, अशोक तडेकर, हरी कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई आणि प्र.कार्यकारी संचालक व्ही.के. ज्योती व अधिकारी उपस्थित होते.

🛑जनता बँक आजरा – सलग सातवा बँको ब्ल्यु रिबन सर्वोत्कृष्ट बँक अॅवार्ड प्रधान.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

आजऱ्यातील जनता सहकारी बँक लि. आजराला बँको ब्ल्यु रिबन अॅवार्डने पुन्हा एकदा सन्मानित करणेत आले. रु ३५० कोटी ठेवी असणाऱ्या देशभरातील सर्व बँकांच्यामधून सर्व आर्थिक निकषामध्ये सर्वोकृष्ट कामगिरी केलेबद्दल दि. २८/०१/२०२५ रोजी लोणावळा येथे आविज पब्लिकेशन ‘बँको’ यांनी भरविलेल्या शिखर परिषदेमध्ये उत्कृष्ट बैंक म्हणून सन्मानित करणेत आले. सदरचा पुरस्कार रिझर्व बँकेचे चिफ जनरल मॅनेजर भार्गेश्वर बॅनर्जी यांचे हस्ते व बँकोचे पदाधिकारी अविनाश शिंत्रे आणि अशोक नाईक यांच्या उपस्थितीत बहाल करणेत आला. यावेळी बँकींग तज्ञ मा अतुल खिरवाडकर उपस्थित होते.

सदरचा पुरस्कार बँकेचे चेअरमन मुकुंददादा देसाई, संचालक महादेव टोपले, रणजित देसाई व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम बी पाटील यांनी स्विकारला.

आज बँकेच्या एकूण ठेवी रु. ३८० कोटी व कर्जे रु. २६० कोटी असून बँकेचा शुन्य टक्के नेट एन.पी.ए. आहे. बँकेच्या एकूण २० शाखा कार्यरत असून परत मुंबई येथे शाखा चालू करणेसाठी रिझर्व बँकेकडे प्रस्ताव पाठविला आहे. बँकेच्या एकूण २० शाखा पैकी १२ शाखा स्वमालकीच्या इमारतीमध्ये कार्यरत आहेत. बँकेकडे सर्व प्रकारचे अद्यावत टेक्नॉलोजी उदा. स्वतःचे डी.सी व डी.आर सेंटर, मोबाईल बँकींग, आय.एम.पी.एस, गुगल पे, फोन पे, पेटीएम, ई कॉम, पॉज, रिसायकलर ए टी एम मशिन, मायक्रो ए टी एम, आर.टी.जी.एस, एन.ई.एफ.टी. इ. सुविधा आहेत.

बँकेने तरुण होतकरु व्यावसायिकांना आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ योजनेअंतर्गत दिल्या जाणार व्याज सवलतीचे रु १०० कोटीची कर्जे व पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या व सबसिडी कर्ज अंतर्गत रु. २१ -कोटीची कर्ज-आदा-करुन कार्यक्षेत्रातील तरुण-उद्योजकांना उभा करणेचे-काम-करत आहोत असे बँकेचे चेअरमन श्री.‌ देसाई म्हणाले.

बँकेच्या प्रगतीमध्ये संचालक व कर्मचारी यांच्याबरोबर सभासदांचाही सिंहाचा वाटा आहे. या विश्वासाच्या जोरावरच येणाऱ्या पाच वर्षात बँकेचा व्यवसाय दुप्पट करण्याचा संकल्प केला आहे असे बँकेचे चेअरमन श्री. देसाई व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. बी. पाटील यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.