आजरा पोलिस वसाहतीची दुरावस्था.- मनसेची जोरदार निदर्शने.【 पोलिस वसाहतीची स्वच्छता केली मनसे पदाधिकाऱ्यांनी. 】
आजरा. प्रतिनिधी. ०८
आजरा येथील पोलीस वसाहतीच्या झालेल्या दुरावस्थेबाबत आजरा मनसे यांनी निदर्शने करून सरकारचा निषेध केला. दि. ८ रोजी दुरावस्थेच्या व आंदोलनाच्या पवित्र्याबाबत बोलताना बांधकाम विभाग जबाबदार आहे. कित्येक वर्षापासून पोलिस आशा दुरावस्था असलेल्या पोलिस वसाहतीत राहत आहेत. या वसाहतीची तूर्तास डागडुजी परिसराची स्वच्छता येणाऱ्या काळात नव्याने सुसज्ज इमारतीसाठी तालुक्याला लाभलेल्या तीन आमदार यांनी पाठपुरावा करुन पोलीस वसाहतीचा प्रश्न मार्गी लावावा असे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले बोलताना म्हाणाले. यावेळी ता.अध्यक्ष अनिल निऊगरे, उपाध्यक्ष आनंदा घंटे यांनी मनोगत व्यक्त केले.
【 बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मनसे पदाधिकारी यांनी धारेवर धरले तुम्हाला आम्ही आठ दिवसापूर्वी निवेदन देऊन वसाहतीची स्वच्छता करण्याची विनंती केली असताना देखील अद्याप आपण स्वच्छता व डागडुजी का.? केली नाही असा प्रश्न उपस्थित केला. 】
यावेळी वसाहतीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विविध मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून केल्या यामध्ये
१) सद्यस्थितीला आजरा पोलीस वसाहतीची डागडुजी , गॅलवानचे नवीन पत्रे, वसाहतीच्या प्रत्येक छतावर बसवावेत.
२) ज्या ठिकाणी प्लास्टर करावयाची गरज असते.अशा खोलीमध्ये नवीन प्लास्टर करावे.
३) पोलीस वसाहतीच्या परिसराची नियमित साफसफाई करणे कमी बांधकाम विभागाने या बाबतची व्यवस्था करावी.
४) या तालुक्यात लाभलेल्या तीन आमदार यांनी दोन्हीही पोलीस वसाहतीचे नूतनीकरणासाठी प्रयत्न करून सुसज्ज अशी वसाहत निर्माण होणेसाठी विधानसभेत आवाज उठवून नविन इमारत मंजूर करून आणावी व एकत्रित वसाहत निर्माण व्हावी. व उर्वरित जागेत सुंदर बगीचा व्हावा अशा आमच्या प्रमुख मागण्या यावेळी केल्या.
तर सद्यस्थितीतील या आमच्या मागण्या आहेतच परंतु या बाबतही दुर्लक्ष झाल्यास दुरावस्था हि आपण येणाऱ्या १५ दिवसात पूर्णत्वास आणावी अन्यथा कोल्हापूर जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभाग
कोल्हापूर कार्यालयाच्या दारात यापेक्षाही तीव्र आंदोलन मनसे स्टाईलने करणेत येईल असा इशाराही देण्यात आला.
जोरदार निदर्शने व महाविकासआघाडी विरोधात घोषणाबाजी.-
【पोलिस वसाहतीच्या अस्वच्छ परिसराची स्वच्छता कधी करणार नाहीतर आम्ही मनसे पदाधिकारी स्वच्छता करायला सुरुवात करतो असे म्हणत मनसेचा मोर्चा पोलीस वसाहत कडे निघाला व समाजसेवा म्हणून मनसे पदाधिकारी यांनी वसाहतीच्या स्वच्छतेला सुरुवात केली. बांधकाम विभागाकडे मुबलक कर्मचारी नाहीत तर ‘कमी तिथे आम्ही’ असे म्हणत आजरा मनसेने परिसराची स्वच्छता केली. 】
यावेळी
जिल्हाध्यक्ष कोल्हापूर नागेश चौगुले, वि.सेना जिल्हा अध्यक्ष
प्रभात साबळे, आजरा. ता.अध्यक्ष अनिल निउंगरे,
तसेच आनंदा घंटे, उपतालुका अध्यक्ष, सचिव चंद्रकांत साबरेकर महिला आघाडी अध्यक्ष पूनम भादवणकर, सरिता सावंत, तेजस्विनी देसाई , प्रमोदिनी देसाई, तसेच
अरून देसाई, सुनिल पाटील, संतोष वाघराळकर, प्रथमेश सुकवे , सतीश किल्लेदार सह पदाधिकारी मनसैनिक उपस्थित होते.