Homeकोंकण - ठाणेआजरा अर्बन, आजरा सूतगिरणीने केली- दोन्ही कोविड सेंटरना आर्थिक मदत.

आजरा अर्बन, आजरा सूतगिरणीने केली- दोन्ही कोविड सेंटरना आर्थिक मदत.

आजरा अर्बन, आजरा सूतगिरणीने केली- दोन्ही कोविड सेंटरना आर्थिक मदत.
आजरा. प्रतिनिधी.०८

आजरा येथील
आजरा अर्बन व आजरा सूतगिरणीच्या वतीने तालुक्यातील दोन्ही कोविड सेंटरना आर्थिक मदतीचा हात दिला आहे.
आजरा तालुक्यात करोणा महामारी मुळे पॉझिटिव रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली असून तालुक्यातील सर्व कोरोना रुग्णांना भार आजरा कोविड सेंटर व रोझरी सेंटरवर पडत आहे. परंतु आजरा तालुक्यातील सर्वच नागरिकांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने गरीब रुग्णांना उपचार घेणे परवडत नसल्याने औषध खरेदीसाठी व इतर गोष्टीसाठी अण्णाभाऊ सूतगिरणी आजरा कडून आजरा शासकीय कोविड सेंटर यांना रुपये ५०,००० ( पन्नास हजार ) इतकी मदत केली असून सदरची मदत अण्णाभाऊ समूहाचे प्रमुख अशोक चराठी यांनी आजरा कोविड सेंटरचे डॉ. देशमुख यांच्याकडे चेक देण्यात आला तसेच आजरा अर्बन बँकेकडून रोझरी कोविड सेंटर आजरा यांना रु ५०,००० ( पन्नास हजार ) इतकी मदत बँकेचे चेअरमन सुरेश डांग यांच्‍याहस्‍ते डॉ. रश्मी राऊत त्यांच्याकडे मदत देण्यात आली या प्रसंगी बँकेचे संचालक व सूतगिरणीचे चेअरमन डॉ. अनिल देशपांडे अधिकारी सचिन सटाले तसेच आजरा कोविड सेंटरचे डॉ. समीर तौकरी ,रोझरी कोविड सेंटरचे डॉ. गौतम नाईक डॉ. सागर पालपोलकर, डॉ. दीपक हळमनकर, डॉ. इंद्रजीत देसाई, डॉ. बी. जी.पाटील यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.