आजरा शहर अंतर्गत घरगुती पाणी पुरवठा योजनेमधील कामाची तपासणी व्हावी.- अन्याय निवारण समितीची मागणी.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा शहर अंतर्गत घरगुती पाणी पुरवठा योजनेमधील कामाची तातडीची नमुना दर्जा तपासणी Urgent Sample Quality Check करणे व इतर चालु असलेल्या कामा बाबत. आजरा अन्याय निवारण समितीने निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आजरा शहराच्या घरगुती पाणी पुरवठा प्रश्नाच्या निमित्ताने आम्ही वेळोवेळी आपल्याकडे अर्ज, मागण्या व भेटी दिल्या आहेत. त्या अनुषंगाने आपण मार्च २०२५ अखेर प्रत्येक घरातमध्ये नवीन पाणी योजनेचे नळाचे पाणी पोहोचवण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. आपले पत्र जा. क्र. आनपं/साप्रवि/१०२२/२०-२४ दि. २३/०९/२०२४. नळ योजनेचे काम जागोजागी होताना दिसत आहे. परंतु या कामामध्ये आम्हाला दिरंगाई, बेशिस्त व कमी किंवा निम्न दर्जा हे दोष दिसत आहेत. आपल्या आश्वासनाप्रमाणे मार्च अखेर काम पूर्ण झाले तरी एका कारणाने आमची शंका भविष्यामध्ये गंभिर ठरु शकते. त्याकडे आपले लक्ष वेधून आम्ही खालीलप्रमाणे मागणी करीत आहोत. नवीन पाणी योजना करतेवेळी पाईप घालणेसाठी खुदाई साडेतीन फुट ते चार फुटापर्यंत पाईपचे व्यासानुसार असणे गरजेचे आहे. त्यानंतर पाईप घातलेनंतर त्यावर तीन ते साडेतीन फुटापर्यंत माती भरावा खडी दगड विरहित असणे गरजेचे आहे. बऱ्याच ठिकाणी रस्ता खुदाई केलेनंतर त्यामध्ये निघालेले सोलिंगचे दगड वापरुन खुदाई केलेला चर भरलेला आहे. रवळनाथ कॉलनीमध्ये चर खंदतेवेळी निघालेल्या एक ते दीड फुट व्यासाच्या सिमेंट कपऱ्या पाईप टाकलेनंतर खुदाई केलेल्या चरामध्ये जेसीबीच्या सहाय्याने ढकलुन चर मुजविणेत आलेला आहे. पुन्हा रस्ता करतेवेळी रोलरचे दबाईमुळे बऱ्याच ठिकाणी पाईप लिकेज होणेची दाट शक्यता आहे.
या नळ योजनेच्या पुर्ततेनंतर पक्या रस्त्याचे काम सुरु होणार आहे. आमच्या माहितीप्रमाणे हे रस्ते कॉक्रीट अथवा डांबरी असणार आहेत. आमच्या शंके प्रमाणे जर हे नळ पाणी योजनेचे व त्याच्या पाईप टाकण्याचे काम कमी दर्जाचे व दोष युक्त असेल आणि त्यावरच नवीन रस्त्याचे काम झाले तर…… भविष्यामध्ये आम्ही आजरा नगरवासीय खणलेले रस्ते व खंडीत पाणी पुरवठा याच्या कायमच्या चक्रात अडकण्याचा धोका आहे. शिवाय मार्च अखेर या कामाचा दर्जा चांगला नाही म्हणून रस्त्याचे काम थांबवले किंवा लांबवले तर लगेत दोन महिन्यांनी पावसाळा सुरु होतो. अशावेळी आता आहे ती दगड/माती व खड्डे असलेल्या रस्त्याची अवस्था पूर्ण पावसाळा व नंतरचा काही काळ सहन करणे हेच आजरेकरांच्या नशीबी येईल. असे झाले तरते अत्यंत दुर्देवी असेल. नागरीक म्हणून आम्हाला अडचणीचे असेलच त्याचप्रमाणे जबाबदार अधिकारी म्हणून आपणास ही ते अडचणीचे व न शोभणारे असतील ही बाब लक्षात घेता नळ योजना पाईपलाईन काम तसेच त्याच्या तांत्रिक डिझाईनमध्ये काही तृटी असतील त्या लवकरात लवकर लक्षात येइल तीतके चांगले आहे. यावर काही तरी उपाय योजना तरी आखता येईल या हेतुने आम्ही, आपण नगरपंचायतीतर्फे तज्ञ तपासणी यंत्रणा आणून सदर कामाची तातडीची नमुना दर्जा तपासणी Urgent Sample quality Check करावी अशी आपणाकडे कळकळीची मागणी करीत आहेत. या कामास सहाय्यभुत ठरण्यासाठी आम्ही आमच्याकडून धनंजय वैद्य, विजय थोरवत, पांडूरंग सावरतकर, सुधीर कुंभार हे तज्ञ नागरीक प्रतिनिधी म्हणून सूचवतो. आपण नेमलेले तज्ञ व आजरा अन्याय निवारण कमिटी सदस्य यांच्यामध्ये तांत्रिक विश्लेषणाचे काम ही करतील. तसेच आमच्या निरिक्षण व अभ्यासानुसार खालील १० ठिकाणचे नमुना तपासणी (Sample Check) साठी सूचवित आहोत.
या सर्वांचा विचार होऊन आपण तातडीने दोन दिवसात निर्णय घेऊन पुढच्या आठवड्यात तपासणी पुर्ण करावी अशी विनंती व आशा समस्त आजरा नगरवासीयांच्या वतीने करतो. तसेच आजरा शहरात चालु असलेले गटारीचे काम गुणवत्तनुसार होत नाही हे आम्ही सूचित करीत आहोत. त्याची योग्य ती तपासणी अन्याय निवारण समिती पदाधिकारी व सदस्य यांचे उपस्थितीत आपल्या कार्यालयामार्फत होणे गरजेचे आहे. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर अध्यक्ष परशुराम बामणे, तसेच विजय थोरवत, पांडुरंग सावरकर, गौरव देशपांडे, जोतिबा आजगेकर, जावेद पठाण, वाय. बी. चव्हाण, दयानंद भोपळे, सह अन्याय निवारण समितीच्या पदाधिकारी व सदस्यांच्या सह्या आहेत.