Homeकोंकण - ठाणेधक्कादायक.जळगावात 'सैराट'ची पुनरावृत्ती.- प्रेमविवाहाचा रक्तरंजित शेवट.( मुलीच्या घरच्यांनी कोयता व चॉपरने वार...

धक्कादायक.जळगावात ‘सैराट’ची पुनरावृत्ती.- प्रेमविवाहाचा रक्तरंजित शेवट.( मुलीच्या घरच्यांनी कोयता व चॉपरने वार करत जावयाला निर्घुणपणे संपवलं.)

💥धक्कादायक.
जळगावात ‘सैराट’ची पुनरावृत्ती.- प्रेमविवाहाचा रक्तरंजित शेवट.
( मुलीच्या घरच्यांनी कोयता व चॉपरने वार करत जावयाला निर्घुणपणे संपवलं.)

जळगाव :- प्रतिनिधी.

पाच वर्षांपूर्वी केलेल्या प्रेमविवाहाच्या रागातून सासरच्या लोकांनी कोयता व चॉपरने वार करत जावयाला निर्घुणपणे संपवल्याची भयंकर घटना जळगाव शहरात घडली आहे. या घटनेत जावयाच्या कुटुंबातील इतर 7 सदस्यही गंभीर जखमी झालेत. कुटुंबाच्या कथित प्रतिष्ठेपायी घडलेल्या या घटनेमुळे अवघे जळगाव शहर सुन्न झाले आहे. तर पोलीसांनी याप्रकरणी सात जणांना अटक केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश रमेश शिरसाट असे मृत जावयाचे नाव आहे. त्याचे 5 वर्षांपूर्वी जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरात राहणाऱ्या पूजा नामक तरुणीशी प्रेमविवाह झाला होता. या दोघांनी घरातून पळून जावून लग्न केले होते. तेव्हापासून शिरसाट कुटुंबीय व तरुणीच्या माहेरील लोकांमध्ये वाद सुरू होता. या वादातून त्यांनी रविवारी मुकेश शिरसाट यांची कोयता व चॉपरने अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. मुकेश शिरसाट रविवारी सकाळी दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर पडला होता. त्यावेळी मुलीच्या माहेरच्या मंडळींनी त्याच्यावर कोयता व चॉपरने हल्ला केला.

त्यात मुकेशच्या मानेवर गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी मुकेशला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ, काका, काकू, दोन चुलत भाऊ, चुलत बहीण आदी सर्वजण मध्ये पडले. हल्लेखोरांनी त्यांच्यावरही हल्ला केला. त्यात पीडित कुटुंबातील 7 सदस्य जखमी झाले. मुकेशच्या पश्चात आई-वडील, भाऊ व पत्नी व एक मुलगी आहे. 5 वर्षांपासून झालेल्या प्रेमविवाहाच्या रागातून मुलीच्या कुटुंबीयांनी ही हत्या केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेमुळे अवघे समाजमन सुन्न झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच जळगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. तसेच रामानंदनगर पोलिस ठाण्यात तरुणीच्या भावासह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर तात्काळ कारवाई करत पोलीसांनी सात जणांना अटक केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.