💥धक्कादायक.- घात / अपघात 💥
बीड पुन्हा हादरलं.- दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या.- तिसरा भाऊ गंभीर जखमी.
( ४ संशयित पोलिसांच्या ताब्यात.)
🟥शुटिंगसाठी जाताना काळाचा घाला.- २३ वर्षीय अभिनेत्याचा मुंबईत अपघाती मृत्यू;- मनोरंजन सृष्टीवर शोककळा.
🟥पुणे-नाशिक महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात.- ९ जणांचा मृत्यू – पाच जखमी लहान बाळाचाही समावेश.
बीड :- प्रतिनिधी.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण ताजे असतानाच बीड जिल्हा पुन्हा हादरला आहे. बीडमध्ये दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर तिसरा भाऊ गंभीर जखमी झाला आहे.आष्टी तालुक्यात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेतले आहे. हत्ये मागचे कारण अस्पष्ट आहे. बीड पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अजय भोसले (30 वर्ष) आणि भरत भोसले (32 वर्ष) अशी हत्या झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. नातेवाईकानेच दोघांची हत्या झाल्याची माहिती मिळत आहेत. अजय आणि भरत भोसले यांचा नातेवाईकांसोबत जुना वाद होता. याच वादातून रात्री निर्घृणपणे या दोघांच्या हत्या झाली. दोघे भाऊ आष्टी तालुक्यातील हातवळण या गावचे आहेत. याच गावापासून 5 किलोमीटर अंतरावर वाहिरा गावच्या परिसरात या दोघांची हत्या झाली. दोघांचे मृतदेह आष्टी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या प्रकरणी संशयित 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल गुरूवारी वाहिरा येथे रात्री दहा वाजताच्या सुमारास हल्लेखोरांनी तीन सख्ख्या भावांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन भावांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही गंभीर घटना अंभोरा पोलिस ठाणे हद्दीत घडली.
🟥आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय विलास भोसले, भरत विलास भोसले, कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ वाहिरा येथे गुरूवारी आले होते. याच ठिकाणी वाहिरा गावातील व बाहेरील काही लोक जमा झाले होते. गरूवारी दुपारपासून हे सगळे याच ठिकाणी होते.रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान यातील काही लोकांनी या तीनही भावांवर लोंखडी रॉड, धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात अजय विलास भोसले, भरत विलास भोसले या दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत. या घटनतेली 4 संशयितांना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा खून का व कोणत्या कारणावरुन केला हे अद्याप समजले नाही.दोनही मृतदेह आष्टी ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले आहेत.
🟥शुटिंगसाठी जाताना काळाचा घाला.- २३ वर्षीय अभिनेत्याचा मुंबईत अपघाती मृत्यू;- मनोरंजन सृष्टीवर शोककळा
मुंबई :- प्रतिनिधी.

‘धरतीपुत्र नंदिनी’ या टीव्ही मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता अमन जयस्वाल याचं आज अपघातात निधन झालं आहे. बाईकवरून शूटिंगसाठी जात असताना मुंबईतील जोगेश्वरी महामार्गावर एका ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला आहे. अमन जयस्वाल हा बलिया, उत्तर प्रदेशचा रहिवासी होता. तो अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आला होता. आपल्या कठोर परिश्रमाने त्याने हे स्वप्न साकार केले. मात्र अवघ्या २३ व्या वर्षी त्याचं अपघाती निधन झालं. अमनच्या मृत्यूने मनोरंजन सृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अमनला सुरुवातीपासूनच अभिनेता बनायचं होतं. तथापि, त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्याने आयएएस अधिकारी, अभियंता किंवा डॉक्टर व्हावे. त्याच्या वडिलांची इच्छा होती की अमनने अभिनेता बनू नये. मात्र त्याच्या आईने अमनला पाठिंबा दिला आणि त्याच्या वडिलांनाही ही बाब समजावून सांगितली. अमन अनेकदा त्याच्या यशाचं श्रेय त्याच्या आईला देत असे. तथापि, आता अमनने या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे.
🟥अमन जयस्वाल हा मूळचा उत्तर प्रदेशच्या बलिया येथील होता. अभिनेता होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आला होता. त्याने मोठ्या मेहनतीने अभिनेता होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. मात्र, वयाच्या २३ व्या वर्षी त्याचा रस्ता अपघातात दुर्देवी मृत्यू झाला आहे. अमनने अवघ्या २३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्याने २०२३ साली टीव्ही चॅनल ‘धरतीपुत्र नंदिनी’ शोमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. या शोमध्ये त्याला मुख्य भूमिका मिळाली होती. याआधी त्याने ‘उडारिया’ आणि ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या टीव्ही मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. ऑडिशनसाठी शुटिंगला जाताना त्याचा अपघाती मृत्यू झाला.
🟥पुणे-नाशिक महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात.- ९ जणांचा करुण अंत – लहान बाळाचाही समावेश.
पुणे :- प्रतिनिधी.

पुणे-नाशिक महामार्गावर पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे झालेल्या भीषण अपघाताच्या घटनेने महाराष्ट्र हादरुन गेला आहे. आज शुक्रवारी पुणे नाशिक महामार्गावर एसटी बस, ट्रक आणि मॅक्झिमो व्हॅनमध्ये मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झालेत. यात एका ५ वर्षीय बाळाचादेखील समावेश आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
🔴समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ तीन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला असून यामध्ये 9 जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही भयंकर घटना घडली. सुरुवातीला प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की चेंडूप्रमाणे ही मॅक्स ऑटो फेकली गेली आणि पुढे एक ब्रेक फेल झालेल्या बसवर आदळली. या भयंकर अपघातात चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा दुर्दैवी अंत झाला.
🟥या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नारायणगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती वर्तवली जात आहे. दरम्यान, या अपघातप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना शासकीय मदत जाहीर केली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल. जखमींच्या उपचाराची योग्य काळजी घ्या, असे पुणे पोलिस अधीक्षकांना सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.