Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रकोरीवडे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या सहा सदस्यांनी अविश्वास ठराव केला...

कोरीवडे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या सहा सदस्यांनी अविश्वास ठराव केला दाखल.

कोरीवडे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या सहा सदस्यांनी अविश्वास ठराव केला दाखल.

आजरा.- प्रतिनिधी.

कोरीवडे (ता. आजरा) ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी पाटील व उपसरपंच धनाजी पाटील यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या सहा सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. यामुळे कोरीवडे गावातील राजकीय वातावरण तापले आहे.
कोरीवडे ग्रामपंचायत मध्ये लोकनियुक्त सरपंच व सात सदस्य अशी रचना आहे. डिसेंबर 2022 मध्ये पार पडलेल्या कोरीवडे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एका गटाला सरपंच पद व तीन सदस्य अशा चार जागा तर दुसऱ्या गटाला सदस्य पदाच्या चार जागा मिळाल्या. गेल्या दोन वर्षापासून शिवाजी पाटील हे सरपंच पदावर तर धनाजी पाटील हे उपसरपंच म्हणून कार्यरत आहेत. मात्र ग्रामपंचायत कारभारामध्ये सदस्यांना विश्वासात न घेता सरपंच व उपसरपंच मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याचा ठपका सहा सदस्यांनी ठेवला आहे. तसेच त्यांचे वर्तन उद्धट असल्याचेही दाखल करण्यात आलेल्या ठरावात म्हटलेले आहे. अविश्वास ठराव सुरेश बोरवडकर, अरुणा पाटील, ललिता पाटील, अस्मिता कांबळे, रेश्मा पाटील, परसू चौगुले या सहा सदस्यांनी दाखल केला आहे. विशेष म्हणजे हे सहा सदस्य परस्परविरोधी आघाडीतून निवडून आलेले आहेत. सहा सदस्यांनी सरपंच व उपसरपंच वर अविश्वास ठराव दाखल केल्यामुळे कोरीवडे गावामध्ये राजकीय वातावरण तापले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.