🛑वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाचे श्री.आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालय पाल येथे उपक्रम संपन्न…
🛑 कोल्हापूर रहिवासी आयोजित.- तु चाल पुढं” या शिर्षकान्वये “दिघा स्टेशन ते नेवा गार्डन बिल्डिंग चौक” असा ३ किलोमीटर “वॉकेथॉन २०२५” या चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन
गारगोटी प्रतिनिधी.
वाचन संस्कृती वाढविण्यासाठी तसेच तरुण पिढीला ग्रंथाकडे आकर्षित करण्यासाठी दि.१ ते १५जानेवारी २०२५ दरम्यान ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. याच उपक्रमांतर्गत वाचन पंधरवड्याचे उद्घाटन श्री.आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. अमर चौगले यांच्या हस्ते झाले. यात ग्रंथालय विभागाद्वारे सामूहिक ग्रंथवाचन व विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीच्या ग्रंथाचे एक तास वाचन केले. तसेच वाचनानंतर प्रत्येक मुलांनी त्यामधील सारांश एक एकमेकांबरोबर कथन केले. या उपक्रमामुळे मुलांच्या मध्ये विशेष आनंद दिसून आला.
वाचन पंधरवडा निमित्त महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनीचे, ग्रंथ परीक्षण स्पर्धेचे, व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ अमर चौगले यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे अयोजन कॉलेजचे ग्रंथपाल प्रवीण यादव यानी केले. यावेळी संस्थेचे संस्थापक श्री अर्जुन आबिटकर सर व प्राचार्य अमर चौगुले श्री. धीरज देसाई सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते. संस्थेचे संस्थापक श्री. अर्जुन आबिटकर यांनी वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सर्व मुलांना शुभेच्छा दिल्या.
🛑 कोल्हापूर रहिवासी आयोजित.- तु चाल पुढं” या शिर्षकान्वये “दिघा स्टेशन ते नेवा गार्डन बिल्डिंग चौक” असा ३ किलोमीटर “वॉकेथॉन २०२५” या चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन
मुंबई.- प्रतिनिधी.

“कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्था, नवी मुंबई” या प्रतिथयश सामाजिक संस्थेतर्फे “We Before Me” या संस्थेच्या सहकार्याने नवी मुंबई शहरातील सन्माननीय ज्येष्ठ नागरिकांकरिता रविवार, दि. १९ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजता “दिघा स्टेशन समोर, पटणी रोड, दिघा, नवी मुंबई” येथे “ELDERTHON – तू चाल पुढं” या शिर्षकान्वये “दिघा स्टेशन ते नेवा गार्डन बिल्डिंग चौक” असा ३ किलोमीटर “वॉकेथॉन २०२५” या चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील कार्यक्रम हा पद्मविभूषण आद. कै. रतनजी टाटा यांना समर्पित करणेत आलेला आहे. स्पर्धेमध्ये जिंकलेल्या प्रथम ३ स्पर्धकांना संस्थेतर्फे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला १ मेडल, १ टी-शर्ट व वॉकेथॉन बीब (ओळखपत्र), नाष्टा, एनर्जी ड्रिंक व पाणी बाटली देण्यात येणार आहे. गेल्या वर्षीही दि. ०७/०१/२०२४ रोजी कमी वेळेत अशा स्पर्धेचे भव्य आयोजन संस्थेने केलेले होते व त्यावेळीही नवी मुंबई शहरातील सन्माननीय जेष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.
कधीकाळी आपल्या व आपल्या कुटुंबाकरिता तरुणपणी धावलेले पण आता सेवानिवृत्तीचे जीवन जगत असलेल्या जेष्ठांना एकत्र करून त्यांना एक चांगला अनुभव देण्याकरिता आम्ही या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. ज्येष्ठ नागरिक आपल्या शारीरिक वेदना विसरून मनसोक्त चालल्यानंतर प्रत्येक ज्येष्ठांच्या गळ्यात मेडल घालताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद व उत्साह पाहुन मनाला एक विलक्षण समाधान मिळत असल्याचे कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्था, नवी मुंबई या संस्थेचे अध्यक्ष श्री. डी. एल. भादवणकर यांनी सांगितले. आम्ही ही स्पर्धा आमचे प्रेरणास्थान व श्रद्धास्थान भारताचे महान देशप्रेमी उद्योगपती व राष्ट्रीय सेवेसाठी आपले जीवन समर्पित करणारे पद्मविभूषण आद. कै. रतनजी टाटा यांना समर्पित करीत असल्याचे, तसेच आमच्या कोल्हापूर रहिवासी विकास सेवा संस्था, नवी मुंबई या संस्थेतर्फे दरवर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती, जागतिक महिला दिन कार्यक्रम, दसरा कौटुंबिक स्नेहमेळावा (सोने लुटणे) तसेच नवी मुंबईतील कोल्हापूरवासियांचा कौटुंबिक स्नेह मेळावा इ. विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असल्याचे अध्यक्ष श्री. भादवणकर यांनी सांगितले. सदर कार्यक्रमास मान्यवर राजकीय नेते व प्रतिनिधी, नवी मुंबई महानगरपालिका, रबाले पोलीस ठाणे, रबाले वाहतूक पोलीस दल या सर्वांचे बहुमोल सहकार्य नेहमीच लाभत असते.