🟥तब्बल ५ महिन्यांनंतर विशाळगड पर्यटकांसाठी खुला!
काही अटी…पहा..👇
🛑अनाधिकृत वीज जोडल्याची कल्पना नसल्याने विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू. (आजरा पोलीसात गुन्हा नोंद.)
कोल्हापूर – प्रतिनिधी.
मागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या दंगलीनंतर तब्बल पाच महिन्यांनंतर किल्ले विशाळगड पर्यटक, दुर्गप्रेमींसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परवानगी दिली असली तरी त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या असून, यामध्ये गडावर यापुढे मांसाहार करण्यास तसेच संध्याकाळी पाचनंतर थांबण्यास बंदी घालण्यात आली आहे.
🟥गतवर्षी जुलै महिन्यात विशाळगड अतिक्रमण प्रकरणी दंगल उसळली होती. त्यानंतर प्रशासनाने पर्यटक, तसेच अन्य लोकांसाठी गडावरील प्रवेश बंद केला होता. या घटनेनंतर तब्बल ५ महिन्यांनंतर प्रशासनाने विविध अटींचे पालन करत ३१ जानेवारीअखेर हा गड पर्यटक, तेथील दर्गा, तसेच तेथील मंदिरात असलेल्या देवतांच्या दर्शनासाठी आज खुला केला आहे.
🛑मांसाहारास मज्जाव
पोलीस प्रशासनाकडून आलेल्या व्यक्तींची पडताळणी करूनच गडावर जाण्यास अनुमती दिली जाणार आहे. सायंकाळी ५ नंतर कोणासही गडावर थांबता येणार नाही, उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे गडावर मांसाहारी पदार्थ घेऊन जाणे अथवा तिथे खाण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या अनुमतीशिवाय कोणत्याही संघटनेस धार्मिक अथवा अन्य कार्यक्रम करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. शाहूवाडी तहसीलदारांनी याबाबत आदेश काढला असून, त्यामध्ये वरील अटींचा तपशील जाहीर करण्यात आला आहे.
🛑अनाधिकृत वीज जोडल्याची कल्पना नसल्याने विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू. (आजरा पोलीसात गुन्हा नोंद.)
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा परोलीवाडीत वीज चोरी मुळे हकनाक बळी गेला आहे. कंत्राटी मजूर मोहनलाल मेझला मांझी बेसरा (वय २३) मुळगाव कसिया डिह पोस्ट बडकी, पुनू ता. ठिकहरा (जि. बोकारी, झारखंड) सध्या रा. कडगाव (ता. भुदरगड) यांच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार धरून जयदीप जीवन शेवाळे (वय २४) रा. एरंडोळ (ता. आजरा) यांच्या विरोधात आजरा पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार अनिल ईश्वर सरंबळे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की, १० नोव्हेंबर २०२४ रोजी जयदीप हा वीज चोरी करण्याच्या उद्देशाने गेला. त्यांने आजोबा गोविंद शेवाळे यांच्या शेतीपंपाच्या वीज जोडणीवरून अनाधिकृत रित्या चेंजआव्हर मधून आईच्या नावे असलेल्या औद्योगिक वीजजोडणीला वीज पुरवठा जोडून घेतला. याच दरम्यान परोलीवाडी (ता. आजरा) येथील रोहीत्र बदलण्यासाठी इंद्रायणी इलेक्ट्रीक्लस यांचे कर्मचारी मोहनलाल गेले होते. त्यांना या अनाधिकृत वीज जोडल्याची कल्पना नसल्याने विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहेत.