बेळगाव चंदगड सावंतवाडी रेल्वे सुरू करणेसाठी प्रयत्न करणार —खासदार धनंजय महाडिक
कोल्हापूर.- प्रतिनिधी.
बेळगाव चंदगड सावंतवाडी रेल्वे लवकरात लवकर सुरू करणेसाठी मी स्वतः जातीने लक्ष घालीन,रेल्वे मंत्र्यांना लवकरच भेटून या रेल्वे करिता निधी आणण्यासाठी प्रयत्न करीन असे आश्वासन खासदार धनंजय (मुन्ना) महाडीकसाहेब यांनी बेळगाव चंदगड सावंतवाडी रेल्वे संघर्ष समितीच्या शिस्टंमंडळाला दिले.
बेळगाव चंदगड सावंतवाडी रेल्वे हा रेल्वे मार्ग 114.6 कि. मी.चा असून जवळपास 1805 करोडचा खर्च अपेक्षित आहे,या रेल्वे मार्गाचा सर्व्हे रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आला असून,या रेल्वे मार्गामुळे चंदगड,आजरा व गडहिंग्लज या तालुक्याचा विकास अपेक्षीत आहे त्याच बरोबर कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिण विभाग रेल्वे मार्गाने देशाशी जोडला जाईल.या संदर्भात कोल्हापूर, बेळगावचे खासदार यांना प्रत्यक्ष भेटून संघर्ष समितीने निवेदन दिली आहेत.या रेल्वे मुळे या तीनही तालुक्यातील जनता कोकण रेल्वे ला जोडून थेट मुंबईला व गोव्याला लवकर जाता येईल.
राज्यसभा खासदार.धनंजय महाडिक यांना नेसरी येथे बेळगाव चंदगड सावंतवाडी रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री सुरेश दळवी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे सुरू करण्यासंधर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आले,यावेळी कार्याध्यक्ष विजयकुमार दळवी,भाजप नेते संग्रामसिंग कुपेकर, चंदगड पंचायत समितीचे माजी सभापती बबनराव देसाई,संघर्ष समितीचे सरचिटणीस रवी नाईक,एकनाथ वाके आदी उपस्थित होते.