सीएच्या अंतिम परीक्षेत आजऱ्यातील हर्षवर्धन जाधव यांचे उज्वल यश
आजरा.- प्रतिनिधी
शालेय व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्यगती साधलेल्या विद्यार्थ्यांचा आदर्श असलेला हर्षवर्धन जाधव याने शैक्षणिक प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. सीए फायनलमध्ये ६०० पैकी ३९७ गुण मिळवून सातारा जिल्ह्यात पहिल्या क्रमांक मिळवला.
रोजरी इंग्रजी हायस्कूल, आजरा, कोल्हापूर येथून दहावी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर, धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स, सातारा येथून ११ वी व १२ वी ९५ टक्के
गुणांसह उत्तीर्ण केली. त्यानंतर चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) च्या फाउंडेशन व इंटरमीडिएट परीक्षाही पहिल्या प्रयत्नात उत्त्वीर्ण केल्या.
तसेच, सोए जीवन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने आर्टिकलशिप पूर्ण केली, कंपनी सेक्रेटरी (सीएस) च्या सर्व टप्यांमध्येही त्याने पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होऊन शैक्षणिक क्षमता सिध्द केल्या आहेत. त्याचे यश त्यांच्या अथक परिश्रम आणि समर्पणाचे प्रतीक आहे. या यशाबद्दल विविध स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.