🛑मोठी बातमी! बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापूला जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय!
🔴राज्यातील सर्व वाहनांना एक एप्रिलपासून फास्ट टॅग बंधनकारक.- राज्य सरकारचा मोठा निर्णय..
मुंबई.- प्रतिनिधी.
एका महिला अनुयायीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ८५ वर्षीय आसाराम बापूला ३१ मार्च पर्यंत अंतरीम जामीन मंजूर झाला आहे, पण या काळात त्यांना आल्या अनुयायांना भेटता येणार नाही, असेही निर्देश देण्यात आलेले आहेत.सध्या त्यांच्यावर जोधपूरच्या आरोग्य मेडीकल सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. जोधपूर मध्यवर्ती कारागृहात ते जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
गांधीनगर सत्र न्यायालयाने फेब्रुवारी २०२३ मध्ये आसाराम बापू या नावाने प्रसिद्ध असलेल्या आसुमल हरपलानी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. एका बलात्कार प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे एकेकाळी देशातील एक शक्तिशाली व्यक्ती असलेल्या आसाराम बापूचा अस्त झाला. बलात्काराच्या प्रकरणात आसाराम बापूची ही दुसरी शिक्षा होती. यापूर्वी, एप्रिल २०१८ मध्ये राजस्थानमधील जोधपूरच्या आश्रमात एका १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले होते. २०१३ मध्ये आसाराम बापूवर जोधपूर आणि गांधीनगर येथे बलात्काराचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.
बलात्काराचे गुन्हे दाखल होण्यापूर्वी आसाराम बापू लोकप्रिय धर्मगुरू होते. १९७० च्या दशकात अहमदाबादमध्ये साबरमती नदीच्या काठावर त्याने पहिला आश्रम सुरू केला होता. त्यानंतर आसाराम बापूने संपूर्ण देशभरात कोट्यवधींचे साम्राज्य उभे केले. त्याच्या आश्रमातील विविध उत्पादनांना आणि आध्यात्मिक साहित्यांना देशभरात प्रचंड मागणी होती. त्याच्या अनुयायांची संख्या लाखोंच्या घरात असल्याचे सांगितले जाते.
राजकीय वर्तुळातही आसाराम बापूचे अनेक अनुयायी होते. आसाराम बापूची लोकप्रियता शिखरावर असताना त्यांच्यासोबत दिसलेल्या काही राजकीय नेत्यांमध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांचा समावेश आहे.
🔴राज्यातील सर्व वाहनांना एक एप्रिलपासून फास्ट टॅग बंधनकारक.- राज्य सरकारचा मोठा निर्णय..
मुंबई :- प्रतिनिधी.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यात राज्य सरकारने मोठा निर्णय घेत १ एप्रिल २०२५ पासून सर्व वाहनांसाठी फास्ट टॅग सक्तीचे केले आहे. टोलनाका पार करण्यासाठी सर्व वाहनांवर फास्ट टॅग लावणे अनिवार्य झाले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता टोलनाक्यावरील वाहनांची गर्दी कमी होण्यास मदत मिळणार आहे. राज्यातील चारचाकी वाहनधारकांसाठी हा खूप मोठा निर्णय आहे.
🟥टोल नाक्यांवर गाड्यांसाठी लागणारा वेळ आणि ट्रॅफिकची समस्या टाळण्यासाठी हा निर्णय सक्तीचा करण्यात आला आहे. नियमांनुसार, जर तुमच्याकडे FASTag नसेल, तर तुम्हाला टोल दराच्या दुप्पट रक्कम भरावी लागेल. सध्या काही जण फास्ट टॅग स्टीकर गाडीवर न लावता टोल नाका आल्यावर काचेवर धरायचे, मात्र तसे आता चालणार नाही. या नियमाचं आता १ एप्रिलपासून कठोरपणे पालन केलं जाणार आहे. फास्ट टॅग प्रोग्राम रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन तंत्रज्ञानावर चालतो. फास्ट टॅग स्टीकर वाहनावर लावल्यानंतर वाहन धारकाला टोल नाक्यावर थांबून टोल न देता फास्ट टॅगचा कोड स्कॅन करून थेट अकाऊंट मधून पैसे देता येतात. यासाठी फास्ट टॅगसोबत बँक अकाऊंट लिंक केलेले असले पाहिजे. बँक वॉलेटमधून डिजिटली पैसे कापले जातात. फास्ट टॅगची वैधता ५ वर्षांची असते. बँक अकाऊंटमधून पैसे कापले जात असल्याने पैसे देण्यासाठी थांबावे लागत नाही, परिणामी टोल नाक्यांवर गर्दी कमी टाळता येते.
🔴फास्ट टॅग ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात मिळतो. आरटीओ ऑफिस, सेवा केंद्र, वाहतूक केंद्र आणि काही निवडक पेट्रोल पंपांवर आणि काही बँकांमध्ये फास्ट टॅग उपलब्ध करण्यात येतात. जर तुम्ही नवीन कार खरेदी केली असेल तर कारवर आधीच फास्टॅग इन्स्टॉल केलेले असते. त्याचा तुम्हाला रिचार्ज करावा लागतो. फास्टॅग खराब झाला तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI द्वारे स्थापन केलेल्या विक्री केंद्रांमधून फास्टॅग स्टिकर खरेदी करू शकता. त्याचबरोबर My Fastag ॲप डाउनलोड करुन फास्ट टॅग सक्रीय करू शकता. याशिवाय टोल प्लाझा येथील विक्री केंद्रातून बनवलेला फास्टॅगही तुम्ही घेऊ शकता. बँकेतूनही फास्टॅग खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेच्या वेबसाइटवर जाऊन फास्टॅगची विनंती करावी लागेल, तुम्ही ते फक्त ऑनलाइन खरेदी करू शकता. याशिवाय तुम्ही ऑनलाइन शॉपिंग साइट्सवरही फास्टॅग खरेदी करू शकता. UPI ॲप्स वापरत असलात तेथूनही खरेदी करू शकता. फास्टॅग खरेदी करण्यासाठी तुम्हाला 400 ते 500 रुपये खर्च करावे लागतील.