Homeकोंकण - ठाणेपरिवर्तनासाठी आतापासून संघर्ष केला पाहिजे.- माजी आम. वैभव नाईक सक्षम विरोधी पक्ष...

परिवर्तनासाठी आतापासून संघर्ष केला पाहिजे.- माजी आम. वैभव नाईक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आपण उभे राहणे गरजेचे.- सतीश सावंत(💥 शिवसेना देवगड तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न.)🛑हुमरस येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या – कुडाळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद..

🛑परिवर्तनासाठी आतापासून संघर्ष केला पाहिजे.- माजी आम. वैभव नाईक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आपण उभे राहणे गरजेचे.- सतीश सावंत
(💥 शिवसेना देवगड तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न.)
🛑हुमरस येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या – कुडाळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद..

देवगड :- प्रतिनिधी.

Oplus_131072

निवडणुकीचा निकाल आपल्या बाजूने लागला नसला तरी आपण सातत्याने जनतेचे काम करीत राहिले पाहिजे. लोकांमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या भक्कमपणे पाठीशी राहिले पाहिजे.आजची परिस्थिती उद्या बदलेल मात्र परिवर्तनासाठी आतापासून संघर्ष केला पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत असा विश्वास माजी आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.

🟣शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या देवगड तालुका कार्यकारिणीची बैठक आज इंद्रप्रस्थ हॉल देवगड सातपायरी येथे संपन्न झाली. यावेळी कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, नगरसेवक बुवा तारी, युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर,हर्षा ठाकूर,संतोष तारी, वर्षा पवार,सरपंच मेनिका पुजारे,रमाकांत राणे,विशाल मांजरेकर, संदीप ढोलकर,सरपंच पूर्वा जाधव, सुनील जाधव, बाजीराव जाधव, सचिन खडपे, यदुनाथ ठाकूर, सरपंच दीपक कदम, मंगेश पाठक,फरीद काझी आदींसह शिवसेना पदाधिकारी, व शिवसैनिक उपस्थित होते.
सतीश सावंत म्हणाले,जनतेची छोटी मोठी कामे करणे, वैयक्तीत योजनांचा लाभ मिळवून देणे हे काम अविरतपणे आपण सुरु ठेवले पाहिजे. येणाऱ्या काळात पदाधिकारी कार्यकर्त्यांची एकजूट टिकवून ठेवणे आणि जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी सक्षम विरोधी पक्ष म्हणून आपण उभे राहणे गरजेचे आहे. तर जनता नक्की आपल्याला साथ देईल असे सांगितले.

🛑हुमरस येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या – कुडाळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

कुडाळ :- प्रतिनिधी.

Oplus_131072

कोलगाव येथील आयटीआयमध्ये शिकणारा हुमरस न्हावीवाडी येथील १९ वर्षीय गणेश प्रकाश नायर या युवकांने काजूच्या झाडाला नायलॉनच्या दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही आत्महत्या का केली याबाबत अद्याप कारण समजून आलेले नाही दरम्यान याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हुमरस न्हावीवाडी येथे राहत असलेला १९ वर्षीय गणेश नायर हा युवक आयटीआय मध्ये शिकत आहे आज मंगळवारी तो घरी आल्यानंतर त्यांचे शेजारी राजाराम लाड यांच्या आईला सांगितले की, बैल आणायला जातो आणि त्यांनी घराच्या पडवीतील नायलॉन दोरी घेऊन तो निघून गेला तो उशिरापर्यंत घरी परतला नाही. दरम्यान त्याचा मावस भाऊ मंगेश धोत्रे हा त्याच ठिकाणी राहतो हा बाजारातून घरी आल्यावर राजाराम लाड त्याच्या आईने गणेश नायर हा बैल आणायला जातो असे सांगून गेला तो अद्याप आलेला नाही असे सांगितल्यावर मावस भाव मंगेश धोत्रे व गणेश नायरचे वडील त्याला शोधण्यासाठी गेले असता राजाराम लाड यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या काजूच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास लावलेल्या स्थितीत गणेश नायर हा युवक आढळून आला त्याने ही आत्महत्या का केली याबाबत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.