🚩कोल्हापूर जिल्ह्यातील व भुदरगड तालुक्यातील.- किल्ले रांगणा……….
संपादकीय.- अग्रलेख
महाराष्ट्र हा निसर्गाच्या कुशीत लपलेलं राज्य यातचं मराठमोळःया माणसाचं रांगडेपण. इथले वैभव हे निसर्गातल्या दऱ्यार किल्ल्यांचे….! किल्ले आणि मराठी माणूस यांचे नाते अतूट माणसाच्या रक्तात भिणला आहे. काही किल्ले प्रसिद्ध आहेत, तर काही किल्ले प्रसिध्द आहेत. तर काही किल्ले प्रसिध्दीपासून वंचित आहेत..
‘रांगणा’ किल्ला हा असाच एक इतिहासकालीन शूर किल्ला प्रसिद्धीपासून वंचित पहाव्यात तर रांगणा परिसराला भेट देणे गरजेचे आहे.
हिरवी गर्द वनराई, असंख्य दुर्मिळ दुर्मिळ अशा औषधी वनस्पती या परिसरात आढळतात. महाराष्ट्रातील जी काहीव परिसराचा उल्लेख करावा लागेल. इतिहासात डोकावत असताना तरुण रक्ताला पूर्वीचे राजकर्ते किती दूरदृष्टीचे होते.
याचा अनुभव या किल्ल्याला भेट दिली असता येतो
महाराष्ट्राच्या इतिहासात किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. किल्ल्यांच्या संख्येवरून राज्यकर्ता सत्ताधिशांची ताकद ओळखली जात असे. महाराष्ट्र हा डोंगरदऱ्याऱ्यांचा, गडकिल्ल्यांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो आधुनिक शस्त्रप्रणालीत किल्ल्यांचे महत्त्व शून्यक्त झालेले असले तरी इतिहासकाळातील लोकांची नैसर्गिक, भौगोलिक व राजकीय महत्व महाराष्ट्रातील प्रत्येक जिज्ञासू अभ्यासकाला जाणून घेणे महत्त्वाचे वाटते मुळातब महाराष्ट्र राज्य म्हणजे नैसर्गिक सौंदर्याची खाणच त्यातच निसर्गरम्य सह्याद्रीच्या अनेक दुर्गम पर्वतरांगांवर असणाो असंख्य गड-किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या शिखरावाचे मुकुटमणीच म्हणावे लागतील प्रत्येक किल्ल्यांची वैशिष्ट्ये वेगळी. तत्कालीन राज्यकर्त्यांनी किल्ला उभा करताना ठेवलेली दूरदृष्टी पाहता ते किती श्रेष्ठ होते, हे लक्षात येते.
■ किल्ले रांगणा येथून पाहता येणारे कोकणातील दरींचे विहंगम दृश्य जिद्द, त्यांच्या दृष्टीने किल्ल्याचे
रांगणा किल्ला हा असाच एक भक्कम तटबंदीवदऱ्या-खोऱ्याऱ्यांनी युक्त असा किल्ला ह्या फिल्ल्याच्यातटबंदीने तत्कालीन अनेक शूरवीरांना आव्हान दिले होते, त्यांच्यासामर्थ्यांची पारख केली होती. त्यांच्याशस्त्राचे असंख्य कर अंगावर झेललेले होते त्याच- प्रमाणे अनेक रणझुजाराना उदार आश्रयही दिला होता किल्ल्याची दुर्गमता, घनदाट अरण्य, त्यावेळची परिस्थिती, बाधकाम यंत्रणा, हे सर्व पाहता मानवी प्रयत्नानी उत्तुंग गिरीशिखरावर उभी केलेली किल्ल्यांची वास्तू न्याहाळताना मानवी धडपडीचे कौतुक मनी दाटून येते
🚩रोमांचकारी इतिहास
रांगणा किल्ला सामर्थ्यवान राजा भोज (द्वितीय) यांनी उभा केला आहे. राजा भोज (द्वितीय) महामंडलेश्वर, राजाधिराज, पश्चिम चक्रवर्ती अशा अनेक उपाधींनी ओळखले जातात. राजा भोज यांनी साताऱ्याच्या उत्तरेस असणाऱ्या महादेव टेकड्यापासून हिरण्यकेशी नदीतीरापर्यंत दक्षिण कोकण व सदाशिवगड (कारवार) ह्या विस्तृत परिसरात राज्यकारभार केला. त्यांनी इ. स. ११८७ मध्ये आपल्या राज्याच्या रक्षणार्थ सुमारे १५ किल्ले उभे केले. रांगणा किल्ला हा त्यांपैकीच एक होय. किल्ल्याची रचना, भौतिक स्थान, नैसर्गिक अनुकूलता याचा विचार करता राजा भोज (द्वितीय) यानी केवढी मोठी दूरदृष्टी बाळगली होती, हे लक्षात येईल. रांगणा किल्ल्याच्या उभारणीतील दूरदृष्टी राजा शिवाजीपर्यंतच्या अनेक राज्यकर्त्यांना मोलाची ठरली आहे. राजा भोज (द्वितीय) यांच्यानंतर शिलाहार घराण्याचा अस्त होत गेला व महाराष्ट्रावर वैभवशाली, वैभवसंपन्न, सुसंस्कृत अशा यादव घराण्याची राजवट सुरू झाली इ. स. १२०९ मध्ये यादव घराण्याचा ‘राजा सिंघण यादव’ या महापराक्रमी राजाने आक्रमण करून शिलाहारांचा संपूर्ण प्रदेश आपल्या ताब्यात घेतला आणि त्याचबरोबर शिलाहाराचे सर्व किल्ले यादव घराण्यात रुजू झाले त्या किल्ल्यामधील रांगणा किल्ला हा महत्त्वपूर्ण सत्ताकेंद्र म्हणून ओळखला जातो. इ. स. १४७० मध्ये अदिलशहाच्या ‘महमद वाण’ याने शंकरदेव याचा पराभव करून रांगणा किल्ला ताब्यात घेतला त्यावेळी या विभागातील संपूर्ण प्रदेश मुसलमानी राजवटीखाली गेला सुमारे ३५० वर्षे रांगणा किल्ल्यावर मुसलमानी राजवट होती. त्यानतर ‘रुस्तुमजमा’ ह्या अदिलशहाच्या सरदाराचा पराभव ‘छत्रपती शिवाजीराजे’ यांचे सरदार रावजी सोमनाथ पंडित, कुडाळ यानी केला व रागण्यावर भगवा फडकला. त्यानंतर विजापूरच्या मुस्लिम राजवटीने रांगणा किल्ला ताब्यात घेण्याचा खूप प्रयत्न केला. रांगणा किल्ला जिंकण्यासाठी ‘अब्दुल करीम इब्ज रेहमान बेहलोलखान’ याच्या नेतृत्वाखाली आलेल्या १२ हजार सैन्यांच्या बरोबर खुद्द शिवरायांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराव भोसले व बाजी घोरपडे हे पण होते. शिवरायानी ह्या सैन्याशी झालेल्या लढ्यात बाजी घोरपड्याचा वध करून आपल्या पित्याच्या अपमानाचा बदला घेतला बेहलोलखान व व्यंकोजीराजे यानी माघार घेतली. शिवरायांच्या असंख्य यशस्वी मोहिमांपैकी ही एक होय. शिवरायानी अनेक वेळा रांगण्यावर वास्तव्य केले आहे दक्षिण दिग्विजयाच्या वेळी छत्रपती शिवाजी गारगोटी-शेणगाव-पाटगाव या मार्गावरून गेले व पुढे दक्षिण दिग्विजय केला. म्हणून आजही हा मार्ग ‘विजयमार्ग’ म्हणून ओळखला जातो ह्या मोहिमेच्या वेळी शिवरायांनी पाटगाव येथे मौनी महाराजाची कृपा संपादन केली. छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीत औरंगजेबाच्या मुलाने कोकण जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यावेळी रांगणा किल्ल्याच्या परिसरात त्याच्या सैन्याचे अपरिमित नुकसान झाले. त्यामुळे तो पुढे न जाता हताश होऊन येथूनच माघारी परतला. इ. स. १८४४ मध्ये हा किल्ला इग्रजानी ताब्यात घेतला. राजर्षी शाहू महाराज यांच्या वैभवसंपन्न कारकिर्दीनंतर १ मार्च १९४९ रोजी बहुसख्य सस्थाने खालसा झाली त्याचबरोबर ह्या किल्ल्यावरील हालचाली थंडावल्या. ह्या किल्ल्याचा विध्वंस इग्रजानी केला
🚩किल्ल्याचे स्थान व स्थिती
रांगणा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात तालुक्याच्या पश्चिमेस व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या ओरसच्या पूर्वेस व भुदरगड किल्ल्याच्या नैऋत्येस आहे किल्ल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही येता येते, तर कोल्हापूर ते गारगोटी-पाटगाव व चिक्केवाडी असेही जाता येते. चिक्केवाडीहून रांगण्यास जाताना घनदाट वनराईतून जावे लागते. दोन्ही बाजूस खडक असणारी वाट आहे.
खंदकाच्या तोंडाशी किल्ल्याची चौकी असावी. सध्या तेथे फक्त उंबरा आहे. उंबऱ्याच्या आत बाजार भरत असे. उबऱ्याच्या शेजारी बाहेरील बाजूस असणाऱ्या टेकडीवरून तोफांचा मारा केला जात असे. डाव्या बाजूस खोल दरी असून, समोरच कातळ माळाचा भरभक्कम बुरूज आहे उंबऱ्याचा १२५ ते १५० फूट रुंदीचा कातळापर्यंतचा भाग खोडून वाट केली आहे.
ही वाट हीच किल्ल्याची मुख्य बाट असून कातळ खोदल्यामुळे बुरुजाची उंची वाढलेली आहे आत दगडी चौकट आहे. येथून आरोळी दिल्यास त्याचे ३ ते ४ प्रतिध्वनी ऐकू येतात. आत मजबूत तटबंदी असून मुख्य दरवाजाही आहे. या दरवाजास ‘गणेश दरवाजा’ असे संबोधले जाते गडास एकूण ३ दरवाजे होते आत जाम्यात खोदलेली विहीर असून जवळच कित्येक फूट खोलीची दरी आहे ही विहीर सदैब पाण्याने भरलेली असते. हा निसर्गाचा फार मोठा चमत्कार मानावा लागेल, आत बालेकिल्ला आहे. कमानीच्या दगडी चौकटीशेजारी पारशी भाषेत कोरलेला शिलालेख पुसट अवस्थेत आहे देवडी, दगडी चौथरे याचे अवशेष, शिवलिंग, नदी, तुळशी वृदावन यांसारख्या खाणाखुणा, चावडी, निंबाळकर वाडा यांचे भग्नावशेष दिसून येतात कुलकर्णी याच्या वाड्यातील ‘वासुदेव’ सुदेव’ या नावानी ओळखली जाणारी मूर्ती सुबक व प्रेक्षणीय आहे रांगणादेवीचे मंदिर सुस्थितीत आहे तिन्ही बाजूस नैसर्गिक तटबंदी व एक बाजूस भरभक्कम दगडी तटबंदी असणारा हा एकमेव किल्ला असावा.
🚩रचना व किल्ल्याची नैसर्गिकता
रांगणा किल्ला भुदरगड तालुक्यातील अत्यत घनदाट समजल्या जाणान्या वनक्षेत्रात असून या किल्ल्याच्या परिसरास दुर्मिळ, अतिदुर्मिळ वनस्पती आढळतात. जंगली श्वापदे, पशुपक्षी याचे वास्तव्य त्या परिसरास भव्यता प्राप्त करून देतात न देतात. ह्या किल्ल्यावरून कोकणचा बराचसा प्रदेश नजरेच्या टापूत येतो, तर प्रत्यक्ष समुद्र दर्शन होणारे कोल्हापूर जिल्ह्यातील हे एकमेव ठिकाण असावे कोल्हापूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या सीमारेषा ह्या किल्ल्याच्या तटबंदीवरून निश्चित झाल्या आहेत. या विभागात घाटमाथा व कोकण याच्या संस्कृतीचा समन्वय दिसून येतो. किल्ला समुद्रसपाटीवरून २२२६ फूट उंचीवर असून पूर्व-पश्चिम लांबी ४७५० फूट, तर दक्षिण-उत्तर लांबी २७४० फूट इतकी आहे किल्ल्याच्या आत बारमाही पाणी व्यवस्था असलेली पिकाऊ शेतजमीन असल्याने हा किल्ला स्वयंपूर्ण म्हणून ओळखला जात असे
कसे जाल ?
कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकावरून गारगोटी या तालुक्याच्या मुख्य गावास जाऊन तेथून पाटगाव किंवा चिक्केवाडी या गावी जाऊन पुढे पायी प्रवास करावा लागतो. कोल्हापूर ते रागणा अंतर १०० ते १०२ कि.मी. आहे. गारगोटीपासून ५० कि मी आहे. स्वतःचे वाहन असणे सोयीस्कर ठरेल. मुक्कामाच्या दृष्टिकोनातून गारगोटी किंवा कडगाव, पाटगाव येथे सोय होऊ शकते. स्वतःची तबूची सोय असल्यास किल्ल्यावर वास्तव्य करणे सोयीस्कर ठरू शकते….
सदर लेख हा..विविध पुस्तके व इतिहासकार, यांच्या कडून माहिती घेऊन शिवभक्तांना सर्वाच्या माहिसाठी थोडक्यात मांडला आहे.
लेखक – मुख्य संपादक – सह्याद्री न्युज मराठी महाराष्ट्र. शिवकार्य.- राजा शिवछत्रपती परिवार महाराष्ट्र (कोल्हापूर.विभाग)