आजरा सूतगिरणीचे कर्मचारी नागेश पाटील ( उंचंगी ) यांचे दुःखद निधन.
आजरा.- प्रतिनिधी.
ता. आजरा उंचंगी येथील नागेश मलगोंडा पाटील वय ४० यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दि. ७ रोजी पहाटे उपचारापूर्वी दुःखद निधन झाले.
ते अण्णाभाऊ सहकारी सूतगिरण आजरा येथे सूतगिरणीच्या वाहनावर ड्रायव्हर म्हणून नोकरी होते. मनमिळाऊ स्वभाव व प्रामाणिकपणा त्याच्या अंगी होता. त्यांच्या अचानक जाण्याने सूतगिरण कर्मचारी व्यवस्थापन व उचंगी पंचक्रोशी हळहळ व्यक्त होत आहे.
त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आई वडील भाऊ वहिनी असा परिवार आहे. गुरुवार दि ९ रोजी रक्षाविसर्जन आहे.