💥धक्कादायक.
🟥लग्नाच्या वाढदिवशी पती-पत्नीने गळफास घेत संपवले जीवन..
💥धक्कादायक- संभाजीनगर हादरले.- मित्रासोबत पळून गेलेल्या बहिणीला भावाने डाेंगरावरून खोल दरीत ढकलले.
मुलीचा मृत्यू.- भावाला अटक
नागपूर :- प्रतिनिधी.

नागपूरात लग्नाच्या वाढदिवशी पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवून या दाम्पत्याने आत्महत्या केली. या दाम्पत्याने लग्नाच्या वाढदिवशी लग्नाचे कपडे परिधान केले. आर्थिक परिस्थितीमुळे दोघांनी आत्महत्या केली. परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ बनवून व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवला आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. जारील ऊर्फ टोनी ऑस्कर मॉनक्रिप आणि पत्नी ॲनी जारील मॉनक्रिप अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत.
6 जानेवारी रोजी रील मनक्रीप आणि डेंनी जेरील मनक्रीप यांनी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. सेलिब्रेशननंतर जेरील मनक्रीप आणि डेंनी जेरील मनक्रीप यांनी लग्नाच्या कपड्यात आत्महत्या केली आहे. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट मिळाली आहे. परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी या सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी जेरील मनक्रीप आणि डेंनी जेरील मनक्रीप यांनी व्हिडीओ स्टेटसला व्हिडिओ लावला होता. पती-पत्नी उदास राहत होते. मुलं नसल्याने त्याच विचारात ते असत. नातेवाईक त्यांची समजूत काढत होते. सर्वच बाजूनी निराश झाल्याने ते गेल्या दोन महिन्यांपासून निराशेच्या गर्तेत गेले. त्यांना जीवनात काहीच रस नसल्याचे वाटत होते. नातेवाईकांनी त्यांची अनेकदा समजूत घातली. दोन महिन्यांपासून दोघे आत्महत्येचा विचार करत होते.
🟥ख्रिसमसनंतर दोघेही निराश होते. दोघांनीही लग्नाच्या वाढदिवशी आत्महत्या केली. लग्न वाढदिवशी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोघांनी जेवणही केले नाही. सकाळपासून दोघांनी काहीही खाले नाही. अंत्यविधीसाठी घरात 75 हजार रुपये ठेवले. चिठ्ठीत आत्महत्या करण्याचे नमूद करत दोघांनी नातेवाईकांची माफी मागितली. जेरील मनक्रीप हे काही वर्षांपूर्वी शेफचं काम करत होते तर त्यांची पत्नी घरकाम करायची. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवले आहेत. सुसाईड नोटसह पोलिसांना स्टॅम्प पेपर आणि घरात 75 हजार रुपये सापडले आहे. अंत्यविधीसाठी हे 75 हजार रुपये घरात ठेवल्याचे या दाम्पत्याने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. आपले राहते घर कुणाला द्यावे याची सुद्धा नोंद त्यांनी स्टॅम्प पेपर वर केली आहे. मुलं होत नसल्यामुळे नैराश्यातून दाम्पत्याने जीवनयात्रा संपविल्याचे कारण समोर आले आहे. बराच काळ पती बेरोजगार होता. दाम्पत्यावर कर्ज झाले होते. आता गुजराण कशी करायची ही विवंचना होती. आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ बनवून व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवला आणि त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
💥धक्कादायक- संभाजीनगर हादरले.- मित्रासोबत पळून गेलेल्या बहिणीला भावाने डाेंगरावरून खोल दरीत ढकलले.
मुलीचा मृत्यू.- भावाला अटक
छत्रपती संभाजीनगर :- प्रतिनिधी.

मित्रासोबत पळून गेलेल्या अल्पवयीन चुलत बहिणीला समजावण्याच्या बहाण्यानं डोंगरावर फिरायला नेऊन तिला दरीत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी छत्रपती संभाजीनगरमधील तिसगाव येथील खवड्या डोंगरावर घडला. अल्पवयीन मुलीचा जागीच मृत्यू झाला. नम्रता गणेशराव शेरकर (१७ वर्ष, रा. शहागड, श्रीराम कॉलनी ता. अंबड जि. जालना) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी पाेलिसांनी ऋषिकेश तान्हाजी शेरकर (वय, २५ रा. वळदगाव ) याला अटक केली आहे. नम्रताचे एका आंतरजातीय तरुणावर प्रेम होते. दोघेही लग्न करणार होते. यातून आपल्या कुटुंबाची मानहानी होईल, या विचारातून चुलत भावाने केलेल्या कृत्याने छत्रपती संभाजीनगर जिल्हा हादरला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, नम्रताचे एका तरुणासाेबत प्रेमसंबंध सुरू होते. काही दिवसापूर्वी ती घर सोडून गेली होती. कुटुंबीयांनी समजूत काढून तिला पुन्हा घरी आणले. यानंतर नम्रताला वळदगाव येथे राहणाऱ्या चुलत्याकडे राहण्यास पाठवण्यात आले. सोमवारी (दि. ७) बाहेरून जाऊन येवू, असे म्हणत चुलत भाऊ ऋषीकेश याने नमृताला खवड्या डोंगरावर घेऊन गेला. याठिकाणी तिच्यासोबत गप्पा मारता-मारता ऋषिकेश याने नम्रताला डोंगरावरून खाली ढकलून दिले. सुमारे २०० फुटावरून खाली पडल्याने नम्रताचा जागीच मृत्यू झाला.
🟥ही धक्कादायक घटना तिसगाव येथील खवड्या डोंगरावर घडली. डोंगराखाली क्रिकेटची मॅच सुरू होती. यावेळी क्रिकेटच्या लाइव्ह प्रक्षेपण करण्यात येत हाेते. त्यामुळे आरोपी ऋषिकेश हा डोंगरावरुन खाली उतरत असतानाचे लाइव्ह प्रक्षेपणावेळी कॅमेर्यात कैद झाले. पोलिसांनी संशयित आरोपी ऋषीकेश शेरकर यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. १७ वर्षीय नम्रता शेरकर हिचे एका आंतरजातीय तरुणावर प्रेम होते. याला कुटुंबीयांचा विरोध होता. काही दिवसांपूर्वी ती घर साेडून गेली होती. कुटुंबियांनी नम्रताची समजूत काढली. तिला पुन्हा घरी आणलं होतं. ती आंतरजातीय विवाहावर ठाम हाेती. काही दिवसांपूर्वी तिला वळदगाव येथे तिच्या चुलत्याकडे राहण्यासाठी पाठविले होते. नम्रतानेआंतरजातीय विवाह केल्यास आपल्या कुटुंबाची मानहानी होईल, या विचारातून चुलत भाऊ ऋषीकेश शेरकर याने केलेल्या कृत्याने छत्रपती संभाजीनगर जिल्हा हादरला आहे.