Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्र६ तारखेच्या मोर्चासाठी आजऱ्यातून शंभर गाड्यांचे नियोजन….जनता बँकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत निर्णय..🛑आजरा...

६ तारखेच्या मोर्चासाठी आजऱ्यातून शंभर गाड्यांचे नियोजन….जनता बँकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत निर्णय..🛑आजरा महाविद्यालयात कला व वाणिज्य विभागाचा शिक्षक पालक मेळावा संपन्न.

🛑६ तारखेच्या मोर्चासाठी आजऱ्यातून शंभर गाड्यांचे नियोजन….
जनता बँकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत निर्णय..
🛑आजरा महाविद्यालयात कला व वाणिज्य विभागाचा शिक्षक पालक मेळावा संपन्न.

आजरा – प्रतिनिधी.

Oplus_131072

गडहिंग्लज महावितरण कार्यालयावर स्मार्ट आणि प्रीपेड मीटरच्या विरोधात निघणाऱ्या मोर्चासाठी आजरा तालुक्यातून शंभर गाड्यांचे नियोजन आज जनता बँकेच्या सभागृहात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जोतिबा चाळके होते. सुरुवातीला सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. डॉ नवनाथ शिंदे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. थंयावेळी बोलताना कॉ संपत देसाई म्हणाले की स्मार्ट आणि प्रीपेड मीटरच्या नावाखाली अदानी आपल्या हक्काची वीज खिशात घालू पाहत आहे. सर्व सामान्य ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट केली जाणार आहे. वीज ग्राहकाबरोबरचं व्यापारी छोटे छोटे उद्योग व्यावसायिक यांचीही लूट होणार आहे. आता आपण गप्प बसलो तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. जन प्रबोधन घडवून मोठ्या प्रमाणात जनतेत उठाव करावा लागणार आहे. त्याची सर्वत्र जोरादर तयारी सुरू आहे. गडहिंग्लज महावितरण कार्यालयावर निघणाऱ्या या मोर्चात आजरा तालुका सर्वात आघाडीवर असेल असे नियोजन करूया. आनंदराव कुंभार म्हणाले की या मोर्चासाठी पक्ष बाजूला ठेऊन सगळे एकत्र येऊया, मोर्चा यशस्वी करून अजऱ्यात एक महापरिषद घेऊया. युवराज पोवार, प्रकाश मोरुस्कर, वाय बी चव्हाण, रवींद्र भाटले, काशिनाथ मोरे, संतोष मासोळे, मारुती कांबळे, संताजी सोले यांनी विविध सूचना मांडल्या.
यावेळी विक्रम देसाई, दशरथ घुरे, शिवाजी डोंगरे, आबा पाटील, विष्णू पाटील, भीमराव माधव, युवराज जाधव, नामदेव फगरे, एन जे सुतार, दिनेश कांबळे, बाबू येडगे, सरिता कांबळे, संतु पाटील, संतु कांबळे, जयराम परीट, नितीन कुंभार, गंगाराम येडगे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🛑आजरा महाविद्यालयात कला व वाणिज्य विभागाचा शिक्षक पालक मेळावा संपन्न.

आजरा.- ०३ प्रतिनिधी.

आजरा महाविद्यालय आजरा येथे इयत्ता अकरावी कला व वाणिज्य विभागाचा पालक मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे होते.
मेळाव्यास मार्गदर्शन करताना प्राध्यापिका जे. एम. कुंभार यांनी शिष्यवृत्ती, जातीचे सर्टिफिकेट व जात पडताळणी यासंदर्भातली माहिती पालकांना दिली. प्राध्यापिका व्ही.पी. देसाई यांनी ‘विद्यार्थ्यांची गैरहजेरी वाढते आहे ती कमी करण्यासाठी पालक व शिक्षक या दोघांनी योग्य प्रमाणात समन्वय साधला पाहिजेत ,’ असे मनोगत व्यक्त केले. प्राध्यापक ए. वाय. निर्मळे यांनी ‘ ‘विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळला पाहिजे आणि शिस्तीचे पालन केले पाहिजेत याविषयी पालकांनीही लक्ष पुरवले पाहिजे ,’असे मत मांनले.


महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री दिलीप संकपाळ यांनी ‘ पुढील वर्षापासून नवे शैक्षणिक धोरण येत असून कला वाणिज्य विज्ञान या शाखेची दरी कमी होऊन कला शाखेच्या विद्यार्थ्यालाही गणित, शास्त्र,अकाउंट या विषयात पारंगत होता येणार आहे त्यामुळे कोणतीही ज्ञान शाखा कमी न लेखता अभ्यास केला तर जीवनात यशस्वी होता येते ,’असे मत व्यक्त केले .
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ अशोक सादळे यांनी ‘ विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी पालक व शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. तसेच कला व वाणिज्य शाखेतून विद्यार्थी आपले चांगले करिअर घडवू शकतो,’ असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक विनायक चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका पी.जी. पाटील यांनी केले . तर आभार प्राध्यापिका एस. जी. धामणेकर मॅडम यांनी मांडली.
या शिक्षक पालक मेळाव्यासाठी प्राध्यापक मल्लिकार्जुन शिंत्रे , प्राध्यापिका रूपाली फोंडेकर,प्राध्यापिका वैशाली देसाई प्राध्यापिका अर्चना चव्हाण , प्राध्यापक विठ्ठल हाके प्राध्यापिका शोभा केंद्रे, प्राध्यापिका संजीवनी कांबळे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.