व्यंकटराव हायस्कूल आजराचे , डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश..
आजरा.- प्रतिनिधी.
विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत
डिसेंबर २०२४ रोजी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व विज्ञान विषय समिती यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत व्यंकटराव हायस्कूल आजरा शाळेच्या विद्यार्थ्यांनी सालाबादप्रमाणे यश संपादन केले आहे. सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेसाठी निवड झाली आहे.
प्रज्ञापात्र गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे यामध्ये
हर्षवर्धन बाळकृष्ण देसाई गुण ८६, आदर्श अशोक गिलगिले गुण ८२, स्वयंम् यशवंत दोरुगडे गुण ८२, निशांत नामदेव दोरुगडे गुण ८०, सोहम सुधीर चौगुले गुण ७६, गौरी हरी कोंडुसकर गुण ६८, शर्वरी श्रीकांत देसाई गुण ६६, राजवीर चेतन हरेर गुण ५६, शोभिता सदानंद कातकर गुण ५६ या विद्यार्थ्यांना
मार्गदर्शक शिक्षक ए. वाय .चौगुले प्रेरणा व प्रोत्साहन अध्यक्ष जयवंत शिंपी व सर्व संचालक आजरा महल शिक्षण मंडळ आजरा प्राचार्य आर . जी .कुंभार पर्यवेक्षिका व्ही. जे. शेलार यांनी केले
