साखर गळीत हंगामातील अचूकतेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..
मुंबई.- प्रतिनिधी.
साखर गळीत हंगामातील अचूकतेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार असल्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. याबाबत म्हटले आहे.
- सहकार विभागाने पुढील १०० दिवसात करावयाच्या कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा.
- .
- राज्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने AI वापरात आल्याने शेतकऱ्यांबरोबरच साखर कारखान्यांसाठीही लाभदायक; AI च्या वापरामुळे गाळपासाठी उपलब्ध ऊसाचे योग्य नियोजन करणे सोपे.
- जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजनेअंतर्गत (वर्ल्डस् लार्जेस्ट गोडाऊन स्कीम) राज्यात १०० विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमध्ये जागेनुसार ३०० मे. टन ते १,००० मे. टनाची गोडाऊन बांधली जाणार.
- या योजनेतून गडचिरोली, नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यातही गोडाऊन उभारण्याच्या सूचना
- सहकारी गृह निर्माण संस्थांचे १००% डिजिटलायझेशन करण्यावर भर; साखर कारखान्यांना देण्यात आलेला मर्जीन मनी आणि साखर कारखान्यामधील वजन काटे मॉनिटरिंगबाबतही सहकार विभागाने दक्ष राहण्याच्या सूचना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत..
