🟥बीडमध्ये सर्वपक्षीय मूकमोर्चा.- आमदार, खासदारांसह बीड जिल्हा रस्त्यावर. ( सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी जनसागर लोटला.)
🟥धक्कादायक.
तिसरी मुलगी झाली म्हणून पतीने पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले. जिल्ह्यातील धक्कादायक घटना. 👇
बीड :- प्रतिनिधी.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेला आज 19 दिवस पुर्ण झाले आहेत. या घटनेवरून मस्साजोगसह राज्यातील नागरिकांनी आणि नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे, या घटनेतील आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत, त्याच्या निषेधार्थ आज बीडमध्ये आज सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. बीडमध्ये मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे, हजारो लोक हातामध्ये छोटे-छोटे पोस्टर घेऊन संतोष देशमुख यांना न्याय देण्याची मागणी करत आहे, हजारो लोक मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं चित्र आहे. सर्वपक्षीय नेते, आमदार, खासदार, सामाजिक कार्यकर्ते, संघटना यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.
🔴सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी जनसागर रस्त्यावरती उतरला आहे. बीडमध्ये सर्व संघटना आणि सर्वपक्षीय नेते रस्त्यावर आले आहेत, बीडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून मूक मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने मोर्चात नागरिकांची उपस्थिती होती. हातात न्यायाचे फलक घेऊन महिला देखील या मोर्चात सामील झाल्या होत्या. आरोपीला फाशी झाली पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावामध्ये कडकडीत बंद होता.
भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडे बंधू भगिनीपवर जोरदार हल्लाबोल केला. मूक मोर्चाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती, जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, अभिमन्यू पवार, नरेंद्र पाटील, ज्योती मेटकर आणि दीपक केदार यांनी संबोधित केले. माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी जर धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपद दिल्यास छत्रपती घराणे या जिल्ह्याचे पालकत्व घेईल असे सांगितले. संतोष देशमुख यांची कन्या वैभवीने सुद्धा मोर्चाला संबोधित केले. यावेळी वैभवीने काल ढगाआड गेलेला सूर्य आज दिसतोय, पण माझे वडिल कधीच दिसणार नाही म्हणताच मोर्चातील जनता गहिवरली.
🟥धक्कादायक.
तिसरी मुलगी झाली म्हणून पतीने पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले. जिल्ह्यातील धक्कादायक घटना. 👇
परभणी :- प्रतिनिधी.
वंशाला दिवा दिला नाही आणि तिसरीही मुलगीच जन्माला घातली म्हणून पतीनं पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना परभणीत घडली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे.
🔴तिसऱ्यांदाही मुलगीच झाली. तेव्हापासून या पती पत्नीमध्ये वारंवार भांडणं व्हायची. 26 डिसेंबरला रात्रीही दोघांमध्ये याच विषयावरुन भांडण सुरू झालं. संतापलेल्या पतीनं पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतलं आणि काडी पेटवली. बघता बघता पत्नीसह घरानंही पेट घेतला. एवढाश्या पत्र्याच्या खोपट्यातून पेटलेली ही महिला मदतीसाठी रस्त्यावर सैरावैरा पळू लागील. आणि पळत शेजारच्या दुकानात पोहोचली. आगीच्या विळख्यात सापडलेल्या महिलेला बघून आजूबाजूच्या लोकांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. मात्र तोवर ही महिला गंभीररित्या भाजली होती. ती बेशुद्ध पडली.
🟥या सगळ्या आगीत दोन दुकानंही जळाली. गंभीर भाजलेल्या महिलेला स्थानिकांनी तातडीनं रुग्णालयात नेलं. मात्र तोवर खूर उशीर झाला होता. तिनं तीन मुलींना अनाथ करुन हे जग सोडलं होतं. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताहेत. मात्र, काही कर्मदरिद्रींना वंशाच दिवा म्हणून मुलगाच हवा असतो. या महाभागांना याचंही सामान्य ज्ञान नसतं की मुलगा किंवा जन्माला घालणं हे स्त्रीच्या नाही तर पूर्णपणे पुरुषावर अवलंबून असतं. मात्र वंशाच्या दिव्याच्या हव्यासापोटी बाईलाच बळी जावं लागतं. काळ बदलला, कायदे आले तरी वंशाच्या दिव्याची हाव अजूनही अनेक महिलांची होळी करतेय. या बुरसटेल्या मानसिकतेतून महाराष्ट्र कधी बाहेर पडणार? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
