🛑स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी सुधीर कुंभार यांची बिनविरोध निवड.
🛑मडिलगेत – आमचा गाव आमचा विकास आराखडा सन. २०२४-२५ जी. पी. डी. पी. आराखडा प्रशिक्षण संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी सुधीर बाबूराव कुंभार यांची बिनविरोध निवड झाली. विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी सहायक निबंधक सुजय येजरे होते.
कुंभार यांचे नाव रवींद्र दामले यांनी सुचविले, त्यास सुनीता कुंभार यांनी अनुमोदन दिले. एकमेव अर्ज दाखल झाल्याने कुंभार यांची बिनविरोध झाली. यावेळी संचालक शिवाजी येसणे, सुकाणू समिती सदस्य मलिक बुरुड, अरुण देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संचालक उपस्थित होते. सहव्यवस्थापक अर्जुन कुंभार यांनी स्वागत केले. अध्यक्ष दयानंद भुसारी यांनी आभार मानले.

चौकट.
संस्थेच्या स्थापनेपासून कै. बाबुराव कुंभार यांच्या संस्थेच्या वाटचालीस सिंहाचा वाटा होता. त्यांचे सामाजिक व राजकीय सहकारातील कार्य कौतुकास्पद होते. त्यांचा मुलगा सुधीर कुंभार यांची प्रथमच उपाध्यक्ष म्हणून वर्णी लागल्याने श्री कुंभार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

🛑मडिलगेत – आमचा गाव आमचा विकास आराखडा सन. २०२४-२५ जी. पी. डी. पी. आराखडा प्रशिक्षण संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

आमचा गाव आमचा विकास आराखडा सन २०२४-२५ जी. पी. डी. पी आराखडा प्रशिक्षण कार्यक्रम मौजे मडिलगे ता. आजरा येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी संजय ढमाळ होते. स्वागत सरपंच बापु निऊंगरे यांनी केले. व प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी राहुल सुतार यांनी केले. यावेळी आमचा गाव आमचा विकास आराखडा प्रशिक्षण मुरलीधर कुंभार, ग्रामपंचायत अधिकारी, बी.टी. कुंभार विस्तार अधिकारी (ग्रा.प.) व सुयोग कुंभार कनिष्ठ अभियंता बांधकाम विभाग यांनी मार्गदर्शन केले सदर प्रशिक्षणासाठी ए.बी. मासाळ कृषी विस्तार अधिकारी, सौ. शांता सुतार ग्रा.प. सदस्य, पं.स. स्टाप, भादवण गणातील सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी.या प.सदस्य, मुख्याध्यापक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सहायक, जलसुरक्षक सी.आर.पी.ग्रा.प कर्मचारी हजर होते. आभार सुशांत गुरव यांनी केले.

