Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रगवसे ता. आजरा - प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैधकीय सोयी नसलेबाबत. शिवसेना उभाठाचे...

गवसे ता. आजरा – प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैधकीय सोयी नसलेबाबत. शिवसेना उभाठाचे निवेदन.

गवसे ता. आजरा – प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैधकीय सोयी नसलेबाबत. शिवसेना उभाठाचे निवेदन.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील गवसे येथे नव्याने उभा केलेले प्राथमिक आरोग्य केंद्र यामध्ये नागरिकांना सोयी सुविधा मिळत नसले बाबत आजरा ता. शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. गवसे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची २५ कोटी खर्च करून भव्य अशी इमारत उभी केलेली आहे-या आरोग्य केंद्राअंतर्गत किटवडे, पाठकवाडी, लिंगवाडी, सुळेरान धनगरमोळा, गवसे, दांभिक शेळप सह विभागातील अशी अनेक ग्रामीण भागातील गावे जोडलेली आहेत.

पण आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उदघाटन करून सहा महिने आले तरी अजूनही या आरोग्य केंद्रावर आरोग्य सेविका, लेक टेक्नीशिअन फार्मासीस्ट, एवन्स रे ऑपरेटर तसेच डॉक्टर यासारखा पूर्णवेळ राहणारा स्टाफ नाही. त्याचबरोबर ज्यांना सलाईन इंजेवाल व औषधाचा मुबलक साटा नसलेमुळे येथे येणा-या रुग्णांचे हाल होत आहेतथा निधी लावून देखील करताना चोयी सुविधा मिळत नाही हे दुर्दैवी आहे. वरी लवकरच वरील मागण्यांचा विचार व्हावा. अन्यथा शिवसेनेच्या वतीने आपल्या कार्यालयावर मोर्चा काढावा लागेल याची नोंद असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील तालुकाप्रमुख युवराज पोवार, विभाग प्रमुख दिनेश कांबळे, अरुण कांबळे सह पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

Oplus_131072

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.