आजरा आठवडा बाजारने घेतला मोकळा श्वास! – नागरिकांसाठी वाट केली रिकामी.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील आजरा अन्याय निवारण समिती वतीने दि. १६ रोजी आठवडा बाजार कसा बसवण्यात यावा या बाबत आजरा नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांच्या बरोबर चर्चा करून त्या बाबतची कार्यवाही शुक्रवार पासून करणेची ग्वाही दिली होती. त्यानुसार आज दि. २० रोजी अन्याय निवारण समिती व नगरपंचायतचे कर्मचारी बाजार ठेकेदारामार्फत योग्य नियोजन करून आज बाजारात व्यापाऱ्यांना व्यवस्थित बसवून बाजारातील गिर्हाईक प्रवासी यांना रहदारी साठी कांहीही अडचण न होता.
आजचा बाजार सुव्यवस्थीत पार पडला
आजचा बाजार बसविण्यात व्यापारी व व्यवसाईक, नगरपंचायत कर्मचारी व ठेकेदाराचे कर्मचारी यांचे सहकार्याने आजचे नियोजन पार पडले आज रोजी व्यापाऱ्यांना योग्य ठिकाणी बसवलेल्या जागी यापुढे नियमित आठवडा बाजार दिवशी त्या ठिकाणी बसण्याचे ठरवले आहे. यामध्ये व्यापाऱ्यांनी देखील सहकार्य केले. त्या सर्वांचे अन्याय निवारण समितीतर्फे अध्यक्ष परशुराम बामणे, उपाध्यक्ष गौरव देशपांडे, विजय थोरवत, मदन तानावडे, वाय बी चव्हाण, ज्योतिबा आजगेकर, बंडा चव्हाण, दिनकर जाधव, दयानंद भोपळे व संजय यादव सह कर्मचारी उपस्थित होते.