जुन्या मीटर ऐवजी स्मार्ट – प्रीपेड मीटर अदानी उद्योग समूहाला ठेका.- आजऱ्यात महाविकास आघाडीचा विरोध.
( तहसीलदार महावितरणला निवेदन. )
आजरा.- प्रतिनिधी.
महारष्ट्र शासनाने महावितरणच्या जुन्या मीटर ऐवजी स्मार्ट आणि प्रीपेड मीटर अदानी उद्योग समूहाला ठेका देऊन बसविण्याचा जो निर्णय घेतला आहे. त्याला जनतेचा तीव्र विरोध असून आजरा तालुक्यातील कोणत्याही ग्राहकाला हे मीटर न देणे बाबत आजरा महाविकास आघाडीच्या वतीने आजरा तहसीलदार व महावितरण यांना निवेदन देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अदानी उद्योग समूहासोबत स्मार्ट मीटर आणि प्रीपेड मीटर बसवण्यासाठी जो करार केला आहे. त्याची मराठी भाषेत प्रत प्रत्येक गावचावडीवर लावून त्यानंतर याबाबत तालुका स्तरावर जनसुनावणी घेऊन जनतेचे मत जाणून घेणे बाबत
साडे सात हॉर्स पॉवरच्या आतील वीज पंपाचे कनेक्शन मिळण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे. त्यांना सोलर सिस्टीमची सक्ती करून विद्युत कनेक्शन नाकारले जात ते तात्काळ थांबवून सर्व मागणीदारांना कनेक्शन तातडीने देणे बाबत.
महारष्ट्र शासनाने अदानी उद्योग समूहासोबत करार करून महावितरणाच्या जुन्या मीटर ऐवजी नवी मीटर बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी अदांनी उद्योग समूहाने नोकरभरतीही केली असल्याचे समजते. प्रायोगिक तत्वावर शासकीय कार्यलयात अशी मीटर बसवली जात आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आणि महावितरण ही शासनाची अधिकृत कंपनी असतांना अदानी उद्योग समूहासोबत असा करार करून स्मार्ट व प्रीपेड मीटरची सक्ती का? असा आमचा सवाल आहे. राज्य विद्युत मंडळ आणि महावितरण कंपनीने प्रस्थापित केलेली सर्व यंत्रणा, पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर अदानी कंपनीला आंदन देण्याचाच हा प्रकार आहे. त्यामुळे महावितरण आणि राज्य विद्युत मंडळ अदानीच्या घशात घातले जाणार आहे. यात नेमके कोणाचे हित साधले जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेलाच आमचा तीव्र विरोध आहे.

याबरोबरच एकीकडे निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्य सरकारने सात अश्वशक्ती वीज पंपाना संपूर्ण वीज बिल माफ करण्याची घोषणा केली होती. ही घोषणा फक्त कागदावरच राहणार आहे का? कारण सात हॉर्स पॉवरच्या वीज पंपाना विद्युत कनेक्शन ऐवजी सोलर सक्ती केली जात आहे. आजरा तालुक्यासारख्या डोंगराळ आणि अति पावसाच्या भागात सोलर सक्ती ही शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. तरी ही सक्ती मागे घेऊन मागेल त्या शेतकऱ्याला वीज कनेक्शन मिळाले पाहिजे.
अदानी उद्योग समूहासोबत स्मार्ट आणि प्रीपेड मीटर बाबत जो करार झाला आहे त्याची प्रत मराठी भाषेत जनतेसाठी प्रत्येक गावचावाडीवर लावून त्यानंतर तालुका स्तरावर शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी जनसुनावणी झाली पाहिजे. अशा जनसुनावण्या होऊन त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत स्मार्ट किंवा प्रीपेड मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही तो हाणून पाडू. याबाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास शासनाला जनतेच्या तीव्र असंतोषाला सामोरे जावे लागेल याची नोंद घ्यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर
कॉम्रेड संपत देसाई, संजय सावंत, युवराज पोवार, रवींद्र भाटले, कॉ शांताराम पाटील, डॉ रोहन जाधव, प्रकाश मोरुस्कर, काशिनाथ मोरे, दत्ता कांबळे, भाई संजय सावंत, सुरेश दिवेकर यांच्या सह्या आहेत.
