मडिलगेचे माजी सैनिक संभाजी घाटगे.- वाढदिवसानिमित्त ग्रामदैवत मंदिर परिसरात केले वृक्षारोपण.
आजरा. प्रतिनिधी.६
आजरा मडिलगे येथील माजी सैनिक संभाजी घाटगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मडिलगे गावातील ग्रामदैवत श्री. भावेश्वरी व श्री. शंकरलिंग, मरगुबाई मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
श्री घाटगे यांच्या परिवाराच्या व मित्र मंडळ यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण करत मंदिर परिसराच्या सुशोभीकरणात भर पडेल व आजच्या तरुण पिढीला आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षारोपण करणे काळाची गरज असल्याचा एक संदेश माजी सैनिक घाटगे यांच्या परिवार मित्रमंडळी यांनी दिला आहे.
या वृक्षारोपण कार्यक्रमाला माजी सैनिक संभाजी घाटगे, शरद पाटील, तसेच नामदेव हासबे, वरुन घाटगे, चंद्रकांत घाटगे, शामराव हासबे, संतोष घाटगे, अक्षय घाटगे, आदित्य जाधव, आनंदा मुरुकटे, अरून घाटगे, नितिश घाटगे, मारुती भोगले, सुरज निऊगरे, सह मित्र परिवार उपस्थित होता.
