Homeकोंकण - ठाणे७५००० हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. 【 प्रभारी नायब तहसिलदार, तलाटी जाळ्यात....

७५००० हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. 【 प्रभारी नायब तहसिलदार, तलाटी जाळ्यात. 】

७५००० हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले.
【 प्रभारी नायब तहसिलदार, तलाटी जाळ्यात. 】

आजरा. प्रतिनिधी. ०६

आजरा येथील तहसिल कार्यालयात महसुल विभागात काम करत असलेल्या दोघांवर अँटी करप्शन झिरो कोल्हापूर पथकाने रंगेहात पकडून कारवाई केली आहे
यामधील आरोपी
संजय श्रीपती येळके, वय ५२ पद उप लेखापाल , वर्ग-३,तहसीलदार कार्यालय आजरा,
अतिरीक्त कार्यभार नायब तहसीलदार,तहसीलदार कार्यालय आजरा,रा उत्तर,ता आजरा, तर राहुल पंडीतराव बंडगर,वय ३३
पद तलाठी,वर्ग-३, सजा इटे ता. आजरा. यांना घटक कोल्हापूर पथकाने तक्रारदार पुरुष ३५ वर्ष यांच्या तक्रारी नुसार हि कारवाई केली आहे. सदर अरोपी यानी लाचेची मागणी १,५०,००० इतकी केली होती परंतु लाच तडजोडी अंती ७५००० हजार इतकी लाच स्विकारली यामध्ये
पडताळणी दि ०५/०७/२०२१तर सापळा दिनांक :- ०५/०७/२०२१
यातील तक्रारदार शिवसेना ता. प्रमुख युवराज पोवार हे खरेदी करणार असलेल्या वर्ग २ च्या शेतजमीनीची वर्ग १ करण्याकरीता १,५०,०००/- रुपये लाच मागणी करुन तडजोडी अंती ७५०००/-रुपये घेताना रंगेहात पकडणेत आले आहे..याप्रकरणी सापळा पथक आदिनाथ बुधवंत,पोलीस उप-अधीक्षक,लाप्रवि कोल्हापूर सतिश मोरे पोलीस निरीक्षक,
सहा फो संजीव बंबरगेकर ,
पोहेकॉ अजय चव्हाण,
पोना सुनिल घोसाळकर ,
पोकॉ रूपेश माने लाप्रवि कोल्हापूर तर मार्गदर्शन अधिकारी राजेश बनसोडे,पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक,लाप्रवि पुणे, सुहास नाडगौडा, अपर पोलीस अधीक्षक,लाप्रवि पुणे, सक्षम आधिकरी :-
मा.जिल्हाधिकारी, कोल्हापूर आदी अधिकारी यांचा सहभाग होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.