आजरा ता. महा ई सेवा केंद्र चालक संघटनेची स्थापना.
अध्यक्ष.- प्रमोद घाटगे, तर उपाध्यक्ष सुनिल निऊगरे, धीरज पाटील
आजरा.- प्रतिनिधी.
राज्यात अनेक वर्षापासून वेगवेगळे शैक्षणिक व अन्य दाखले विविध शासकीय कामासाठी शासनाने अधिकृत महा-ई-सेवा केंद्राची स्थापना केली आहे. या माध्यमातून नागरिकांची कामे होत आहेत. व योग्य त्या कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर शासनाने दिलेल्या कालावधीच्या मुदतीत व दराप्रमाणे सदर महा-ई-सेवा केंद्र नागरिकांचे दाखले, अन्यसेवा शासनाच्या योग्य दरात करत नागरिकांना सेवा देत आहेत.. म्हणून याला माहा ई सेवा केंद्र असे संबोधले जाते. परंतु या महा-ई-सेवा केंद्रांना अनेक वेळा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही वेळा शासन दरबारी एकसंघ होऊन अनेक महा ई सेवा केंद्र बाबत विषयाची मांडणी व मागणी करावी लागते. यासाठी महा-ई-सेवा केंद्र संघटित होण्यासाठी सदर संघटना स्थापन केली असल्याचे समजते. यामध्ये महा- सेवा केंद्र आजरा तालुका यांच्यावतीने दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी आजरा तालुका महा ई सेवा केंद्र चालक यांच्यामार्फत संघटना स्थापन करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष प्रमोद घाटगे यांनी आजरा तालुक्यातील नागरिकांनी आपल्या हक्काचे माह ई सेवा केंद्र या ठिकाणी आमच्याकडून सेवेचा लाभ घ्यावा. आम्ही आपल्या सेवेसाठी तत्पर असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित विनोद ओतारी, धीरज पाटील, सुनील निऊंगरे, प्रेमानंद पोवार,, कुमार कांबळे, प्रणव तवंदकर,चेतन मोहिते, संदीप सरोळकर,सूर्याजी पाटील उपस्थित होते. उपाध्यक्ष पाटील यांनी आभार मानले.
चौकट.
तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे .
अध्यक्ष – प्रमोद घाटगे (भादवण )
उपाध्यक्ष – धीरज पाटील (महागोंड ) खजिनदार – विनोद ओतारी (आजरा )
सचिव – मंदार कोडक ( आजरा ) आजरा तालुका मार्फत जिल्हा प्रतिनिधी
.प्रेमानंद पोवार (कोवाडे )
विकास चोथे (बहिरेवाडी )
यांची सर्वानुमते निवड झाली.