स्वप्निल लोणकर आत्महत्या.-
सरकार ३१ जुलैपर्यंत सर्व रिक्त जागा भरणार.- अजित पवार यांची घोषणा..
मुंबई. प्रतिनिधी. ०५
एम.पी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.स्वप्निलच्या आत्महत्येचे पडसाद राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित करत सरकारला जाब विचारला. तर भा.ज.पा.चे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वप्निलच्या कुटुंबियांना मदत करण्याची मागणी केली.
विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एम.पी.एस.सी.ची सर्व रिक्त पदे ३१ जुलै २०२१ पर्यंत भरण्याची घोषणा केली.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी एम.पी.एस.सी. परीक्षेच्या मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधलं.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात उत्तर दिलं.अजित पवार म्हणाले,“सभागृहाचा पहिला दिवस असतानाच विरोधी पक्षनेत्यांनी एम.पी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण स्वप्निल लोणकर या उमेदवाराच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला.ही बाब वेदनादायी आहे.अशी घटना कुणाच्याही बाबतीत घडू नये,अशी सरकारची भूमिका आहे.मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात चर्चा केली,”असं अजित पवार म्हणाले.
“मला विरोधकांसह राज्यातील जनतेला सांगायचं की, स्वप्निल लोणकर याने २०१९ मध्ये राज्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा दिली होती.मुख्य परीक्षा २४ नोव्हेंबर २०१९ रोजी झाली.परीक्षेचा निकाल २८ जुलै २०२० रोजी लागला.या परीक्षेत ३,६७१ उमेदवार पात्र ठरले. १२,०० पदांसाठी ही परीक्षा झाली होती.
