Homeकोंकण - ठाणेआजरा बांबू क्लस्टर फाउंडेशन / हिरण्यकेशी बांबू ग्राम विकास शेतकरी गट यांच्या...

आजरा बांबू क्लस्टर फाउंडेशन / हिरण्यकेशी बांबू ग्राम विकास शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमानाने बांबू उत्पादक शेतकऱ्यांचा केरळ दौरा..

आजरा बांबू क्लस्टर फाउंडेशन / हिरण्यकेशी बांबू ग्राम विकास शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमानाने बांबू उत्पादक शेतकऱ्यांचा केरळ दौरा..

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

आजरा, चंदगड, भुदरगड, गडहिंग्लज आणि कागल तालुक्यातील बांबू उत्पादक शेतकरी आजरा बांबू क्लस्टर फाउंडेशन ऐया कंपनीच्या माध्यमातून संघटित होत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठी पेरणोली ता. आजरा येथील हिरण्यकेशी बांबू ग्राम विकास शेतकरी गटाने पुढाकार घेतला होता. हिरण्यकेशी बांबूच्या व्यावसायिक बांबू शेती आणि प्रक्रिया उद्योग निर्मितीसाठी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत चिमणे ता. आजरा येथे भुमी उत्पादक शेतकरी गट तयार झाला आणि बांबू लागवडीची ही मोहीम भुदरगड, चंदगड, गडहिंग्लज, कागल आणि राधानगरी या तालुक्यांमध्ये हळूहळू दृढ होत आहे. यातूनच सामुदायिक स्तरावरील बांबू उद्योग निर्मिती करीता आजरा बांबू क्लस्टर फाऊंडेशन कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.

हिरण्यकेशी बांबू ग्राम विकास शेतकरी गट आणि आजरा बांबू क्लस्टर फाऊंडेशनच्या निवडक २५ बांबू उत्पादक शेतकऱ्यांचा कर्नाटक आणि केरळ राज्यातील बांबू उद्योगांचा अभ्यास दौरा आयोजित केला आहे.

Oplus_131074

या दौऱ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांची हि टिम पहिल्या दिवशी ९डिसेंबर रोजी बेंगलोर मधील इंडियन वुड अॅंड सायंस टेक्नॉलॉजी या महत्त्वाच्या संस्थेला भेट देतील. यानंतर बांबू पासून प्लायबोर्ड निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या इपिर्टी या संस्थेसोबत नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डिझायनिंग या संस्थेच्या बांबू स्टुडिओला भेट देतील.
दुसऱ्या दिवशी १० डिसेंबर रोजी केरळ राज्य सरकार आणि नॅशनल बांबू मिशन आयोजित केरळासह देशभरातील विविध राज्यांतील बांबू उत्पादक शेतकरी, बांबू कारागीर, शास्त्रज्ञ, उद्योजक आणि मशीन डेव्हलपर कंपन्या या सर्वांना एकत्रित निमंत्रित करुन केरळ बांबू फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. ७ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या सोहळ्याला कोल्हापूर जिल्ह्यातील बांबू उत्पादक शेतकरी भेट देतील.
तिसऱ्या दिवशी ११ डिसेंबर रोजी केरळ फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटच्या बांबू संशोधन केंद्रांना भेटी दिल्या जातील आणि सर्वात शेवटी देशभरात बांबू क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उरावू बांबू या बांबू क्लस्टरला भेट देऊन हे सर्व शेतकरी परतीचा प्रवास करणार आहेत.
आज दि. ८ रोजी आजरा येथून स.१० वा. शेतकरी या दौऱ्यासाठी निघाले यावेळी वसंतराव तारळेकर, अॅ. विकास पाटील , माजी सभापती निवृत्ती कांबळे, काॅ. शिवाजी गुरव , शिवाजी इंगळे, शिवाजी येसणे कृष्णा वरेकर , तुकाराम गडकरी, रामदास देसाई, अर्जुन कांबळे, अब्दुलवाहिद सोनेखान, पत्रकार कृष्णा सावंत, रणजीत कालेकर, लोकमत उपसंपादक धनाजी कांबळे, संभाजी जाधव, सह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांचे स्वागत निवृत्ती कांबळे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.