महाविकास आघाडीतील घटक पक्षाची. महत्वाची बैठक – प्रमुख पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन.
आजरा.- प्रतिनिधी.
महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवारगट), शिवसेना (उबठा), श्रमिक मुक्ती दल, गिरणी कामगार संघटना व अन्य मित्र पक्ष संघटना यांची व्यापक बैठक आयोजित केली आहे.
विषय-
१- नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आढावा घेणे. पराभवाची कारणमीमांसा करणे
२- एव्हीम किंवा तत्सम गोष्टींचा वापर करून लोकशाही व्यवस्था मोडून काढून सत्तेवर आलेल्या सरकार विरोधात आंदोलनात्मक कृती कार्यक्रम आखणे.
३- आजरा तालुक्यातील जनतेच्या विविध प्रश्नांची चर्चा करून त्यावर ईथुनपुढच्या काळात एकसंघपणे लढणे.
वरील विषयावर चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यासाठी ही बैठक होणार असून आपण सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे.
तारीख व वेळ – मंगळवार दि १० डिसेंबर २०२४ दुपारी ठीक३.०० वाजता.
ठिकाण – जनता सहकारी बँक आजरा यांचे सभागृह.
निमंत्रक असे आवाहन
इंडिया आघाडी व महाविकास आघाडी आजरा तालुका यांनी केले आहे. संपर्क
९४२३२८७३४४