कु. तिऊरवाडकर हिची जलसंपदा विभागात कॅनॉल इन्स्पेक्टर व जिल्हा न्यायालय पुणे येथे लिपिक पदावर निवडीबद्दल सत्कार.
आजरा.- प्रतिनिधी

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा च्या स्पर्धा परीक्षा विभागाची अभ्यासक कु. ऋतुजा सुनिल तिऊरवाडकर हिची महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात कॅनॉल इन्स्पेक्टर व जिल्हा न्यायालय पुणे येथे लिपिक पदावर निवड झालेबद्दल वाचनालयात तिचा सत्कार करण्यात आला. वाचनालयाच्या उपाध्यक्षा सौ. विद्या हरेर यांच्याहस्ते शाल, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून तिचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष श्री वामन सामंत होते. कार्यवाह कुंडलिक नावलकर यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले.
अध्यक्ष श्री वामन सामंत यांनी मनोगत व्यक्त केले. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या स्पर्धापरीक्षा विभागातून आजरा परिसरातील अनेक विध्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड होत आहे हि वाचनालयासाठी अभिमानाची बाब आहे असे ते म्हणाले.
ऋतुजा हिने सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर केवळ एक-दीड वर्षाच्या कालावधीत एकाचवेळी दोन परीक्षा उत्तीर्ण होऊन उज्ज्वल यश संपादन केले आहे. आपल्या या यशात आई वडील, शिक्षक आणि वाचनालयाचे बहुमोल सहकार्य लाभल्याचे तिने सांगितले.
कार्यक्रमाला सहकार्यवाह रवींद्र हुक्केरी, संभाजी इंजल, बंडोपंत चव्हाण, विनायक अमाणगी, गीता पोतदार, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर सौ. रंजना तिऊरवाडकर, बाळकृष्ण दरी, महादेव गवंडळकर, प्रसाद तिप्पट, बाळासाहेब कांबळे, कार्तिक गुरव, माधुरी गवंडळकर, मधुरा पंडित, निखिल कळेकर, महादेव पाटील उपस्थित होते.