जनता सहकारी बँक लि. आजरा बँकेचा “बँको ब्लु रिबन-२०२४” पुरस्काराने सन्मान
( वेगवेगळ्या सलग २१ पुरस्काराने सन्मानित केलेली कोल्हापूर जिल्ह्यातील अग्रगण्य बँक – चेअरमन श्री मुकुंददादा देसाई यांची माहिती..)
आजरा.- प्रतिनिधी.
कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्श व अग्रगण्य बँक जनता बँक आजरा या बँकेस “बँको ब्लू रिबन” कडून उत्कृष्ट कामकाजाबद्दल सन-२०२३-२४ सालाचा उत्कृष्ट बँक म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. सदरचा पुरस्कार हा देशातील सर्व सहकारी बँकामधून बँकाच्या कामाचे मूल्यमापन व प्रगतीचा आढावा घेऊन देण्यात येतो. सर्वसामान्यांची व जनतेच्या जिव्हाळ्याची बँक म्हणून ओळख असलेल्या जनता बँकेस आजपर्यंत बँको ब्लू रिबन, बँकिंग फ्रंटीअर, बँक असोसिएशन अशा वेगवेगळ्या संस्थाकडून २१ वेळा उत्कृष्ट बँक म्हणून गौरविण्यात आले आहे.
बँकेकडे रु-३८५ कोटीच्या ठेवी, रु-२५५ कोटीचे कर्ज, रु-१५५ कोटीची गुंतवणूक असून, बँकेचा एन.पी.ए. 0% इतका आहे. बँकेकडून नवीन व्यावसायिकांना आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ या योजनेंतर्गत रु.९५ कोटी व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत रु.१० कोटी इतका कर्जपुरवठा केला आहे, या योजनेंचा लाभ तरुण व होतकरू व्यावसायिकांनी करून घ्यावा, असे आवाहान श्री देसाई यांनी केले. बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून, २० शाखांमधून बँकेचे कामकाज चालते. बँकेकडे RTGS, NEFT, PHONE PAY, GOOGLE PAY, UPI यासारख्या डिजिटल बँकिंग च्या सर्व सेवा उपलब्ध आहेत. सदरचा पुरस्कार म्हणजे ग्राहक सभासदांचा विश्वास, सुयोग्य नियोजन, तत्काळ सेवा, पारदर्शी कारभार, काटकसर आणि संचालक व कर्मचाऱ्यांचे योगदान याचे फलित आहे, असे चेअरमन श्री. देसाई यांनी सांगितले. यावेळी बँकेचे व्हा. चेअरमन अमित सामंत सह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.