सिद्धार्थनगर आजरा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास मानवंदना..
आजरा.- प्रतिनिधी.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास मानवंदना देण्यासाठी सिद्धार्थ नगर आजरा येथे कार्यक्रम करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपस्थित आजरा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शंकर कळकुटे तसेच अन्याय निवारण समिती अध्यक्ष परशुराम बामणे(भाऊजी )सुधीर बापू कुंभार.गौरव देशपांडे. .विजय थोरवत. संतोष भाटले . मंदार बिरजे.शैलेश पाटील. आनंदा कुंभार. नितीन यादव.सुरेश कांबळे भरत कांबळे. सुभाष कांबळे .प्रकाश कांबळे सचिन कांबळे उपस्थितीत राहून . मानवंदना देऊन बौद्ध वंदनाला सुरुवात झाली.
तसेच श्री. कळकुटे यांनी युवा पिढीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणावे असे मार्गदर्शन केले. तसेच शिका संघटित व्हा संघर्ष करा हे बाबासाहेबांचे ध्येय डोळ्यासमोर धरून तुम्ही स्पर्धा परीक्षांना सामोरे जावा. भविष्यात तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये कुठे अडचण आली तर संपर्क करा असे वचन युवा पिढीला दिले. यावेळी सुधीर बापू कुंभार यांनी बाबासाहेब यांनी शंभर वर्षांपूर्वी परिस्थिती नसताना काय शिक्षण केले होते हे लोकांना पटवून दिले. त्यानंतर अमोल कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी जय भीम तरुण मंडळाचे कार्यकर्ते अक्षय माळी . श्रीधर कांबळे.अश्विन कांबळे. गौरव कांबळे .आकाश कांबळे. महेश कांबळे .विशाल कांबळे .उत्तम कांबळे. राजेश कांबळे. असे अनेक भीमसैनिक व महिला भगिनी उपस्थितीत होते.
