Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रकल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी-यळगुड च्या संचालकपदी सन्मती...

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी-यळगुड च्या संचालकपदी सन्मती बँकेच्या सभासदांची निवड

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी-यळगुड च्या संचालकपदी सन्मती बँकेच्या सभासदांची निवड

हुपरी.- प्रतिनिधी.

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी-यळगुड च्या संचालकपदी सन्मती बँकेच्या सभासदांची निवड झालेबद्दल सुनील पाटील, प्रशांत महादेव कांबळे, महेश पाटील, सुभाष जाधव व दादासाहेब सांगावे यांचा सन्मती सहकारी बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची सन 2024-2029 सालची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली.

या संस्थेच्या संचालकपदी सन्मती बँकेचे चेअरमन सुनिल पाटील, प्रशांत कांबळे, महेश पाटील, सुभाष जाधव व दादासाहेब सांगावे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचा सन्मती सहकारी बँकेच्या वतीने या नुतन संचालकांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बीओएम चेअरमन डॉ. होसकल्ले, शितल पाटील, आण्णासो मुरचिट्टे, सी. ए. पाटील, ए. जे. पाटील, महावीर येळरूटे, डॉ. निमा जाधव, अजित कोईक, संजय कुडचे, सीईओ अशोक पाटील, अनंत पुजारी, बोर्ड सेक्रटरी महेश कुंभार आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.