Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रव्यंकटराव येथे संस्थेमार्फत माजी शिक्षकांचा "शिक्षक सन्मान सोहळा" संपन्न.

व्यंकटराव येथे संस्थेमार्फत माजी शिक्षकांचा “शिक्षक सन्मान सोहळा” संपन्न.

व्यंकटराव येथे संस्थेमार्फत माजी शिक्षकांचा “शिक्षक सन्मान सोहळा” संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील महाल शिक्षण मंडळ आजरा संस्थेमार्फत “माजी शिक्षक सन्मान सोहळा” नुकताच संपन्न झाला
या सोहळ्यासाठी संस्थेअंतर्गत विविध शाखांतून सेवानिवृत्त झालेले जवळजवळ ३० शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांचा यथोचित सन्मान झाल्यानंतर प्रास्ताविक शिवाजी पारळे यांनी केले. शिक्षक मनोगत एम ए पाटील यांनी व नवीन शिक्षकांना या सेवानिवृत्त शिक्षकांचा परिचय पी एस गुरव यांनी करून दिला.
सेवानिवृत्त शिक्षकांमध्ये ए के पावले, एस जी इंजल, बी.बी. गुरव व सी आर देसाई यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले व आपण ज्या- ज्या वेळेला आम्हास कोणत्याही कामासाठी प्रशालेत बोलावलात तर आम्ही निश्चित येत राहू असे सांगितले.. आणि आनंद व्यक्त केला.
संस्थेचे सचिव अभिषेक शिंपी यांनी आपल्या मनोगतामध्ये सर्व शिक्षकांना या शिक्षक सन्मान सोहळ्याचे आपले उदात्त उद्दिष्ट सांगितले.. यामध्ये प्रथम त्यांनी संस्थेतील विविध शाखांमधून आजपर्यंत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांनी आजरा तालुक्यातील विविध खेडोपाडी ,वाडी वस्ती मधून शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थी व पालकांना समुपदेशन करून प्रसंगी त्या विद्यार्थ्यांचा स्वतः खर्च करत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले प्रतिवर्षी आपले शैक्षणिक उद्दिष्ट साध्य करत शाळेच्या व संस्थेच्या नावलौकिकत भर टाकत आज व्यंकटराव हा ब्रँड निर्माण करणे काम मोलाचे योगदान दिले आहे . आपण आजपर्यंत अनेक इंजिनियर, डॉक्टर, प्राध्यापक, उद्योजक, सायंटिस्ट, कलाकार, खेळाडू निर्माण केलात हा शाळेचा सन्मान व देशसेवाच आहे .याबद्दल प्रथमता सर्वांचे आभार मानले. आणि कौतुकही केले. आज इयत्ता पहिली ते पदवीपर्यंतचे शिक्षण आपल्या संस्थेच्या एका छताखाली जयवंतराव शिंपी यांच्या दूरदृष्टी , अथक परिश्रमातून व सुसज्ज तीन मजली इमारतीच्या उभारणीमधून आज यशस्वीपणे सरकार होताना दिसत आहे. संस्थेमार्फत शिक्षणाची ही ज्ञानगंगा अशीच वाहत ठेवत आपणा सर्वांच्या सहकार्याने अकॅडमी चे वर्ग सुरू करून तालुक्यातील हुशार व होतकूर विद्यार्थी शहरातील जादा फी साठी त्याचे शिक्षण आणि स्वप्न साकार होण्यासाठी आपण कमीत कमी फी मध्ये किंवा एखाद्या गरजू गरीब विद्यार्थ्यांना संबंधित फी देखील माफ करून शिक्षण देण्याचा मानस आहे जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचे ध्येय पूर्ण करून देश सेवेच्या कार्यात आपल्याला हातभार लावता येईल हा उदात्त हेतू बाळगून कार्य सुरू असल्याचे सांगितले. यासाठी वेळोवेळी आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. आपले पाय निश्चित शाळेकडे वळले पाहिजेत. आपला नेहमीच यथोचित सन्मान राखला जाईल कला, क्रीडा, साहित्य, करिक्युलम साठी नवीन शिक्षकांना आपल्या अनमोल अनुभव व मार्गदर्शनाची आवश्यकता आहे असे सांगितले.


यावेळी संस्थेचे अध्यक्ष जयंतराव शिंपी म्हणाले तालुक्यातील व्यंकटराव ही पहिली शाळा ही आपणा सर्वांच्या कार्यकर्तृत्वातून दिवसेंदिवस नावारूपाला येत आहे. इथे घडलेले विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकत आहेत. हे फक्त आजी आणि माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अध्यापन सहयोगातूनच. या विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण मिळावे म्हणून शासनाचा कोणताही निधी नसतानाही ही तीन मजली इमारत बांधून पूर्ण केली आहे.
आभार पी. व्ही. पाटील यांनी मांनले या सन्मान सोहळ्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष एस पी कांबळे, खजिनदार सुनील पाटील, संचालक सचिन शिंपी, पांडुरंग जाधव, सुधीर जाधव, विलास पाटील, के.जी पटेकर, विक्रम पटेकर, विश्वास जाधव, नाईक साहेब, माजी शिक्षकासमवेत व्यंकटराव हायस्कूल, व्यंकटराव ज्युनिअर कॉलेज, व्यंकटराव महाविद्यालय, व्यंकटराव प्राथमिक, भादवण हायस्कूल, सिरसंगी हायस्कूल देवर्डे हायस्कूल. या सर्व शाळांचे मुख्याध्यापक पर्यवेक्षिका व स्टाफ उपस्थित होते‌.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.