Homeकोंकण - ठाणेआमच्या गावाचं मतदान गेलं कुठं? - आता पैसे भरतो म्हणत बॅलेट पेपरवरील...

आमच्या गावाचं मतदान गेलं कुठं? – आता पैसे भरतो म्हणत बॅलेट पेपरवरील मतदानासाठी गावकऱ्यांनीच घेतला पुढाकार!.- राज्यातील अनेक गावात उडणार आहे गोंधळ..

🟥आमच्या गावाचं मतदान गेलं कुठं? – आता पैसे भरतो म्हणत बॅलेट पेपरवरील मतदानासाठी गावकऱ्यांनीच घेतला पुढाकार!.

सोलापूर.- प्रतिनिधी.

संपूर्ण राज्यात ईव्हीएम वरील मतदानावरून बरीच चर्चा सुरू आहे. आता सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या गावानेच यात उडी मारली आहे. थेट तहसीलदारांकडे बॅलेट पेपरवर आमच्या गावाचे मतदान घ्या. अशी मागणी केली आहे. ज्या गावांमध्ये उत्तम जानकर यांना मोठे मते देखील मिळते, त्या गावात भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाल्याने स्वखर्चाने गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.
🔴विधानसभेच्या निवडणुकीत या गावात उत्तम जानकर यांना 843 मते तर विरोधी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना 1 हजार 3 मते मिळाल्याचे दिसून आले. यापूर्वी झालेल्या 2009 पासून च्या तीन निवडणुकांमध्ये आणि लोकसभा निवडणुकीत देखील गावात 80 टक्के मतदान जानकर यांच्या गटाला झाले. त्या संदर्भातील पुरावे जोडले आहेत. या निवडणुकीत मोठा घोटाळा झाल्याचा आक्षेप घेत तपासण्यासाठी 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर मतदान घ्या असा ठराव गावाने केला असून त्याचा संपूर्ण खर्च आमचा गाव भरण्यास तयार असल्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.


🟥या गावात चाचणी निवडणूक घ्यायची आहे त्यामुळे शासकीय कर्मचारी मिळावेत अशी देखील मागणी या गावाने केली आहे. त्या संदर्भातील सर्व पैसे आम्ही भरू असे या गावाने तहसीलदारांना स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.