ऊसतोड कामगारांच्या मुलांना मुमेवाडी ता. आजरा येथे.-
पहिलीच्या वर्गात दिला प्रवेश..
( या विद्यार्थ्यांचे केले प्राथमिक शाळेने स्वागत.)
उत्तुर.- प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील प्राथमिक विद्यामंदिर मुमेवाडी येथे या गावामधील व परिसरातील ऊस तोडीसाठी आलेल्या बीड येथील ऊसतोड कामगार यांच्या मुलांना ऊसतोड संपेपर्यंत त्यांना शिक्षण मिळावं या हेतूने येथील नागरिकांच्या सहकाऱ्यांनी
कुमारी जानवी बालाजी गायकवाड रा.आंबेजोगाई, जिल्हा .बीड या ऊसतोड मजुरांच्या मुलीला इयत्ता पहिली मध्ये प्रवेश देण्यात आला. तिचे शाळेमार्फत स्वागत करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य , सर्व शिक्षक वृंद व ग्रामपंचायत मुमेवाडी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्याचे तालुक्यात शिक्षक व ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे..
चौकट…
एक हात मदतीचा…
प्रा. वि. मुमेवाडी ता. आजरा यथे सुसज्ज क्रीडांगणासाठी.
अनमोल सहकार्य _
श्री. साई स्टोन क्रेशर मुमेवाडी यांचेकडून जे.सी.बी. च्या साह्याने क्रीडांगणातील स्वच्छता करण्यात आली….
