Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रनगरपंचायतकडून आजरा रहिवाशांना प्राथमिक सुविधा मिळणेबाबत.. अन्याय निवारण समितीची नगरपंचायत प्रशासनाशी बैठक🛑पेरणोली...

नगरपंचायतकडून आजरा रहिवाशांना प्राथमिक सुविधा मिळणेबाबत.. अन्याय निवारण समितीची नगरपंचायत प्रशासनाशी बैठक🛑पेरणोली तंटामुक्त अध्यक्षपदी अमर पवार यांची निवडआजरा.- प्रतिनिधी

🛑नगरपंचायतकडून आजरा रहिवाशांना प्राथमिक सुविधा मिळणेबाबत.. अन्याय निवारण समितीची नगरपंचायत प्रशासनाशी बैठक
🛑पेरणोली तंटामुक्त अध्यक्षपदी अमर पवार यांची निवड.


आजरा.- प्रतिनिधी

आजरा येथील अन्याय निवारण समितीने आजरा नगरपंचायत मधील चाललेल्या कारभाराबाबत निवेदन देऊन मुख्याधिकारी सह प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. विधानसभा सार्वत्रिक निवडणूका असल्याने अचारसंहिता लागू झाल्यामुळे आपण व आपले कर्मचारी निवडणूक कामासाठी नेमणूक झाली असलेमुळे आजरा शहर व उपनगरामध्ये प्राथमिक सुविधा पुरवणेबाबत आपणास अडचणी येत होत्या. त्यामुळे आम्हाला सुध्दा आपलेशी चर्चा करता आली नाही. शहराच्या बऱ्याच विभागाचा पाणी पुरवठा पूर्ण विस्कळीत झालेला आहे. बरेच ठिकाणी पाईप लाईनला गळती लागलेली असून पाणी पुरवठा कमी दाबाने व अनियमित चालु आहे. त्याबाबत आपल्याकडे बरेच अर्ज व विनंत्या केलेल्या आहेत. त्याच प्रमाणे शहरातील गटारी साफ करणे रस्त्याकडील गवत काढणे ही काने आपलेकडून अद्याप चालु झालेली नाहीत. त्याचप्रमाणे शहरातील अनेक ठिकाणी गटारीची कामे अर्धवट सोडून दिलेली आहेत ती पूर्ण कधी होणार? दोन दिवसांपूर्वी शिव-कॉलनीमध्ये गटर बांधकाम सुरु होते. सदर कामासाठी वाळू ऐवजी इस्टर्मिश्रीत ग्रिट वापरत होते. त्याठिकाणी आपले कर्मचारी देखरेखीसाठी नव्हते त्या ठेकेदाराकडे कोणतीही कागद‌पत्रे नव्हती तेंव्हा अशी कामे चांगली व मजबुत करून घेणे ही जबाबदारी आपली आहे. ही जबाबदारी आपलेकडून दुर्लक्ष केली गेली जात आहे.
आम्ही बयाच वेळा आपणास निवेदन देणेकरीता गेलो असता आपण मुख्यालयाबाहेर कामासाठी गेलेला असता तेंव्हा आम्हाला तुमचेशी वरील सर्व बाबी व सध्या चालु असलेल्या कामाबाबत चर्चा करणेसाठी गुरुवार दि. २८/११/२०२४ रोजी बैठक व्हावी या अनुषंगाने आजरा नगरपंचायत मध्ये झालेल्या बैठकीत.
खालील मुद्दे मांडण्यात आले व चर्चा करण्यात आले यामध्ये

१) नविन पाणी पुरवठा योजनेची सध्यस्थिती.
२) शिव कॉलनी मधील सांडपाण्याची व्यवस्था कशि करणार
३) गटर व रस्त्याची कामे निवीदा नोटीस काढून नोंदणीकृत ठेकेदाराना देणे व कामाचे ठिकाणी नकाशे ठेवणेस सांगणे.
४) भारत नगरामध्ये अर्धवट राहिलेली गटर पुर्ण करणे व पाणी गळती काढणे.
५) चाफेगल्ली येथे दुध डेअरी पाठीमागील अडवलेला रस्ता खुला करून देणे.
६) वाणी गल्ली (सावंत मॅडम) च्या घरामागील गटर स्वच्छ करून सांडपाण्याचा निचरा करणे.
७) पाणी पुरवठा ठेकेदारासोबत मिटींग लावणे.
८) समर्थ कॉलनी मधील चुकिचे बांधण्यात आलेले गटर काढुन नवीन गटर बांधकाम करावे व रस्ता रुंद करून मिळावा. दररोज वेळेवर योग्य दाबाने पाणीपुरवठा करावा.
९) आजरा शहरातून गेलेल्या महामार्गावरील दिव्यांची व्यवस्था लवकर करावी.
१०) आयडियल कॉलनी येथील अर्धवट मुजवलेली विहिर लवकरात लवकर मुजवून पुर्ण करावी.
११) बळीराम देसाई नगर मधील पाणी पुरवठा व्यवस्थित व सुरळीत करावा व राहिलेली गटर व रस्ते पुर्ण करावेत.
१२) गोठण गल्ली गर्ल्स हायस्कूल समोर गटर तुंबलेले आहे ते साफ करून सांडपाण्याचा निचरा करावा.
१३) आझाद कॉलनी मधील जाणून बुजून वाकडी तिकडी बांधणेत आलेली गटर सरळ करुन रस्ता रुंद करून मिळावा.
१४) रवळनाथ कॉलनी आजरा येथील अंगणवाडी शेजारील बोअरवेल चोरीला गेलेचा दिनांक २७/३/२०२४ च्या अर्जाची दखल अजून घेण्यात आली नाही.
१५) गांधीनगरातील दरवाजकर वसाहतीत रस्ता व गटरे करणे बाबत.
१६) आपटे कॉलनी मधील चालु झालेली गटरची बांधकामे थांबवणेत आली आहेत ती चालू करावीत.
१७) आजरा गांधीनगर रस्त्यावरील मंजीरीच्या ठिकाणी व आपटे कॉलनी मधे पोल उभारून रस्त्यावरील लाईट चालू करावी
या प्रमाणे मुद्दे चर्चिले असून मा. मुख्याधिकारीसो यांचेकडून सकारात्मक उत्तरे मिळाली आहेत. यावेळी अध्यक्ष परशुराम बामने (भाऊजी) , वाय.बी. चव्हाण. सेक्रेटरी, सालागार समिती, जोतिबा आजगेकर उपाध्यक्ष, सल्लागार समिती, संजय जोशी सदस्य, पांकुरंग सावरतकर, सचिव जावेद पठाण अध्यक्ष अल्पसंख्यांक सेल, दिनकर जाधव सचिव, सल्लागार समिती बंडोपंत चव्हाण सदस्य,
संतोष बांदीवडेकर, अभिजित संकपाळ सह सर्व सदस्य उपस्थित होते.

🛑पेरणोली तंटामुक्त अध्यक्षपदी अमर पवार यांची निवड

आजरा : – प्रतिनिधी

पेरणोली ता आजरा येथील ग्रामसभेत तंटामुक्त अध्यक्षपदी अमर पवार तर समितीत रवींद्र देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच प्रियांका जाधव होत्या.
अध्यक्षपदासाठी पवार, राजेंद्र सावंत व रविंद्र देसाई यांची नावे पुढे आले. त्यात पवार यांच्या नावावर एकमत होऊन निवड करण्यात आली. सभेत पंधरावा वित्त आयोगातील पंचवार्षिक आराखडा, आर्थिक बजेट या विषयावर चर्चा झाली. चर्चेत दिनेश कांबळे, शेखर कळेकर, पांडुरंग दोरूगडे, पंकज देसाई, अविनाश जोशीलकर , ऊदय कोडक आदींनी सहभाग घेतला. यावेळी उपसरपंच संदीप नावलकर, सदस्य संकेत सावंत, रणजीत फगरे, सुनिता कालेकर, शुभदा सावंत, कांबळे आदी उपस्थित होते.ग्रामसेवक संदीप चौगुले यांनी अहवाल वाचन करून आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.