Homeकोंकण - ठाणेबिहारमध्ये मतपत्रिकेवर निवडणूक घ्या.- महाराष्ट्रातील मतांच्या घोळावरून लालू प्रसाद यादव यांची मोठी...

बिहारमध्ये मतपत्रिकेवर निवडणूक घ्या.- महाराष्ट्रातील मतांच्या घोळावरून लालू प्रसाद यादव यांची मोठी मागणी.🟥महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होण्याची शक्यता….

🟥बिहारमध्ये मतपत्रिकेवर निवडणूक घ्या.- महाराष्ट्रातील मतांच्या घोळावरून लालू प्रसाद यादव यांची मोठी मागणी.
🟥महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होण्याची शक्यता….

युपी.- वृत्तसंस्था

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. पण सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएमचा गैरवापर केल्याचा आरोप होतोय. मतं वाढवल्याचा आरोप केला जात आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी मोठी मागणी केली आहे. बिहारमध्ये मतपत्रिकेवर निवडणूक घ्या, अशी मागणी लालू प्रसाद यादव यांनी केली आहे.
🟥दिल्लीत एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना लालू प्रसाद यादव म्हणाले की, पुढच्या वर्षी बिहारमध्ये निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचा विजय होईल. आम्हाला बहुमत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक ही मतपत्रिकेवर घ्यावी, अशी मागणीही लालू प्रसाद यादव यांनी केली आहे.

🟥महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होण्याची शक्यता

मुंबई :- प्रतिनिधी.

महायुती सरकारचा शपथविधी नेमका कधी आणि कुठे होणार? याकडे देशाचे लक्ष लागले आहे. आता याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती मिळत आहे.
🔴विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत जोरदार चर्चा रंगल्या होत्या. भाजपने या निवडणुकीत १३२ जागांवर विजय मिळवल्याने मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असे बोलले जात आहे. मात्र यामुळे सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले. एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्रि‍पदाबाबत जो निर्णय घेतील, त्यास माझा आणि शिवसेनेचा पाठिंबा असेल, अशी भूमिका जाहीर केली. यामुळे भाजपच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला. काल अमित शाह यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र अद्याप भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
🟥आता महायुती सरकारचा शपथविधी सोहळा नेमका कुठे पार पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महायुती सरकारचा शपथविधी कुठे होणार? याबाबत राजशिष्टाचार विभागाकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे. मुहायुतीचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला आझाद मैदानात पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच शिवाजी पार्क रेसकोर्स, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि राजभवन या पर्यायांची देखील चाचपणी केली जात आहे. राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी शिवाजी पार्कची पाहणी केल्याची माहिती समोर आली होती. 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीत कुठलाही अडथळा न येता शिवाजी पार्कवरच शपथविधी करण्यावर भर देण्यात येत होता. तसेच वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट सामने सुरू असल्याने इतर ठिकाणांचीदेखील चाचपणी सुरू होती. मात्र आता आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल, अशी माहिती मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.