Homeकोंकण - ठाणेएकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा.- ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन...

एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा.- ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी.- केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य.- / मुख्यमंत्री कोण होणार हे आधी ठरवा, मगच दिल्लीत या.- भाजप श्रेष्ठींचा शिंदे-फडणवीस-अजितदादांना आदेश?

🛑एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा.- ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी.- केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य.- मुख्यमंत्री कोण होणार हे आधी ठरवा, मगच दिल्लीत या.- भाजप श्रेष्ठींचा शिंदे-फडणवीस-अजितदादांना आदेश?

मुंबई.- प्रतिनिधी.

🟪महाराष्ट्रातील नव्या सरकारचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावरून महायुतीत जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपविला आहे. आता पुढचा मुख्यमंत्री कोण यावरून शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच असताना एनडीएचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
🟥एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे, त्यांना केंद्रात आणा. जर ते ऐकलेच नाहीत तर भाजपाने शिवसेनेला बाजुला करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करावे असे म्हटले आहे. शिंदेंनी अडीज वर्षे चांगले काम केले आहे. यामुळे त्यांनी केंद्रात यावे व देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हायला हवे, असे आठवले म्हणाले आहेत.

🔴शिंदेंनी फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून तीन दिवस झाले तरी महायुतीचा मुख्यमंत्री कोण हे ठरत नाहीय. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला मुख्यमंत्री पद हवे आहे. फडणवीस यांच्या नावावर अजित पवारांची देखील संमती आहे. परंतू तिकडे शिंदे शिवसेनेत कुरबुर सुरू झाली आहे.

🟥एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात चांगल्या योजना आल्या, मोठे यश मिळाले. यामुळे महायुती एवढे चांगली कामगिरी करू शकली आहे. यामुळे शिंदेंनाच मुख्यमंत्री करावे असे शिवसेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

🟥मुख्यमंत्री कोण होणार हे आधी ठरवा, मगच दिल्लीत या.- भाजप श्रेष्ठींचा शिंदे-फडणवीस-अजितदादांना आदेश?

मुंबई :- प्रतिनिधी

महायुतीत आता मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपला महायुतीत सर्वात जास्त जागा मिळाल्या असल्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपचाच असावा असा युक्तीवाद केला जात आहे. त्याला राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी पाठिंबाही दिला आहे.
🔴शिवाय केंद्रीय रामदास आठवले यांनीही भाजपचाच मुख्यमंत्री झाला पाहीजे असं म्हटलं आहे. तर निवडणूक मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली आहे. त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्री करावं असा युक्तीवाद शिंदेंची शिवसेना करत आहे. त्यामुळे पेच कायम आहे. यावर आता मुख्यमंत्री कोण हे आधी तुम्हीच ठरवा नंतर दिल्लीत या अशा सुचना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दिल्या आहेत, असे समजते आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत महायुतीत पेच अजूनही कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिली. त्यानंतर त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत. महायुतीला पूर्ण बहुमत असल्याने ते सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. पण मुख्यमंत्री कोण हे ठरत नसल्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा करता आलेला नाही. यावर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी तोडगा काढावा असे आदेश केंद्रीय नेतृत्वाने दिले आहे.
🅾️फडणवीस, शिंदे आणि अजित पवार हे दिल्लीला जाणार अशी चर्चा होती. मात्र गेल्या दोन दिवसापासून हे नेते मुंबईत आहेत. मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा या तिन्ही नेत्यांनी मुंबईत करावी. त्यावर एकमताने अंतिम निर्णय घ्यावा. नाव निश्चित करावे. त्यानंतर दिल्लीत यावे असे स्पष्ट निर्देश भाजपच्या श्रेष्ठींनी दिले आहेत. त्यानंतर दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाईल. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिंदे,फडणवीस आणि पवारांची संयुक्त बैठक होणार आहे. त्यात निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. विधानसभा निवडणुका या महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. जे यश महायुतीला मिळाले आहे त्यात शिंदेंचा वाटा मोठा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहीजेत असा आग्रह शिंदेंच्या शिवसेनेचा आहे. तशी वक्तव्यही त्यांच्या नेत्यांनी केली आहे. स्वत:शिंदे यांनाही मुख्यमंत्री व्हायचे आहे. अशा वेळी ते सहजासहजी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडण्यास ते तयार नाहीत. अशा वेळी दिल्लीतील श्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.