Homeकोंकण - ठाणेसत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग.- देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल तर एकनाथ शिंदे उद्या...

सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग.- देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल तर एकनाथ शिंदे उद्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार?🛑मुख्यमंत्रिपद भाजपला जवळपास निश्चित.- एकनाथ शिंदे नाराज? – सर्व गाठीभेटी केल्या रद्द?🟥भाजपशी जवळीक फायदेशीर ठरली नाही.- मनसेच्या बैठकीत पराभूत उमेदवारांनी राज ठाकरेंसमोर मांडले म्हणणे.- ईव्हीएमबाबतही उपस्थित केली शंका?

🔴सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग.- देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल तर एकनाथ शिंदे उद्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार?
🛑मुख्यमंत्रिपद भाजपला जवळपास निश्चित.- एकनाथ शिंदे नाराज? – सर्व गाठीभेटी केल्या रद्द?
🟥भाजपशी जवळीक फायदेशीर ठरली नाही.- मनसेच्या बैठकीत पराभूत उमेदवारांनी राज ठाकरेंसमोर मांडले म्हणणे.- ईव्हीएमबाबतही उपस्थित केली शंका?

मुंबई :- प्रतिनिधी.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला. हा निकाल लागून दोन दिवस झाले आहेत, पण अद्याप मुख्यमंत्रीपदचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे नवीन सरकारचा शपथविधी सोहळाही लांबणीवर पडला आहे. दरम्यान, उद्या महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्या आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. पण, त्यानंतर ते काही काळ राज्याचे हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील.
🟪मीडिया रिपोर्ट्सनुसार, सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या राज्यपालांकडे राजीनामा सोपवणार आहेत. त्यानंतर ते नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधीपर्यंत हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत अजून राज्यात सस्पेंस कायम आहे, त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्याची शिवसेनेतून मागणी होत आहे, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजप आमदार आग्रही आहेत.
आता याबाबतचा अंतिम निर्णय दिल्लीत होणार आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. तिथे अमित शाहांसोबत होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय होईल. शनिवारी, 23 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. यात महायुतीने 235+ जागा जिंकून महाराष्ट्राची सत्ता काबीज केली. 288 पैकी 132 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 41 जागा मिळवल्या. या निवडणुकीत विरोधकांना मोठा फटका बसला. काँग्रेस 16, शिवसेना 20 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 10 जागा मिळाल्या. काँग्रेस-राष्ट्रवादीची ही आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी ठरली आहे.

🛑मुख्यमंत्रिपद भाजपला जवळपास निश्चित.- एकनाथ शिंदे नाराज?
🟥सर्व गाठीभेटी केल्या रद्द?

मुंबई :- प्रतिनिधी

Oplus_131072

विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर महायुतीत मुख्यमंत्रिपद भारतीय जनता पक्षालाच जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाले आहेत. आपली नाराजी त्यांनी पक्षाच्या आमदारांपर्यंत पोहोचवलेली आहे. सायंकाळ नंतरच्या सगळ्या गाठीभेटी त्यांनी रद्द केल्या आहेत, असे समजते आहे.

🔴वर्षावर पोहोचलेल्या शिवसेनेच्या आमदारांदेखील शिंदे भेटलेले नाहीत. मुख्यमंत्रिपद जाणार असल्यानं शिंदेंचे आमदारदेखील नाराज झाले आहेत. अशी माहिती मिळत आहे. महायुतीला शिंदेंच्या नेतृत्त्वात विधानसभेत नेत्रदीपक यश मिळाल्यानं मुख्यमंत्रिपद त्यांच्याचकडे ठेवण्यात यावं, अशी शिवसेना आमदारांची आग्रही मागणी होती. पण ती पूर्ण होताना दिसत नाही. पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झालेलं आहे. त्यामुळे शिंदे नाराज झाले आहेत. मुख्यमंत्रिपदी कायम राहण्यासाठी एकनाथ शिंदे गेल्या ३६ तासांपासून भाजपच्या नेतृत्त्वाशी वाटाघाटी करत होते. भाजपनं १३२ जागा जिंकल्यानं आमदार, नेत्यांचा मुख्यमंत्रिपदासाठी दबाव वाढलेला आहे.

🟥मागील ५ वर्षे सर्वाधिक आमदार असलेला पक्ष असूनही भाजपला मुख्यमंत्री मिळालं नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्रिपद सोडू नये, अशी राज्य भाजपमधील नेत्यांची भूमिका आहे. त्यांच्या भावना समजून घेत पक्षानं मुख्यमंत्रिपद न सोडण्याची ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाले आहेत. संध्याकाळी दिल्लीतून मेसेज आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यांचे सगळे नियोजित कार्यक्रम रद्द केले. संध्याकाळनंतरच्या त्यांच्या सगळ्या गाठीभेटी रद्द करण्यात आल्या. वर्षावर पोहोचलेल्या स्वपक्षीय आमदारांनादेखील ते भेटलेले नाहीत. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना प्रचंड आग्रही आहे. त्यासाठी शिंदे निकाल लागल्यापासून भाजप नेतृत्त्वाशी बोलत होते, अशी माहिती मिळत आहे.

🔴तर आज शिवसेनेचे अनेक आमदार, माजी मंत्री सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. पण या सगळ्याचा शिवसेनेला काहीही फायदा होताना दिसत नाही. महायुतीत भाजपला १३२, शिवसेनेला ५७ आणि राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या आहेत. भाजप बहुमताच्या अगदी जवळ पोहोचल्यानं संख्याबळाच्या खेळीत मित्रपक्षांचं महत्त्व कमी झालेलं आहे. त्यातच राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना थेट पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेची मोठी गोची झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून मुख्यमंत्रिपदाबद्दलचा फैसला जाहीर करण्यात येईल. नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव तेच घोषित करतील.

🟥भाजपशी जवळीक फायदेशीर ठरली नाही.- मनसेच्या बैठकीत पराभूत उमेदवारांनी राज ठाकरेंसमोर मांडले म्हणणे.- ईव्हीएमबाबतही उपस्थित केली शंका?

मुंबई :- प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज बैठक पार पडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवतीर्थ येथे ही बैठक पार पडली. या बैठकीला मनसेचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत भाजपशी जवळीक चूक ठरल्याची भावना अनेक उमेदवारांनी राज ठाकरेंसमोर बालून दाखवल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आधीपासून ईव्हीएमबाबत संशय व्यक्त केला जात आहे. आता मनसेच्या बैठकीत पराभूत उमेदवारांनी देखील ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित केले. राज ठाकरेंनी उमेदवारांकडून ईव्हीएमबाबत त्यांची मते जाणून घेतली. भाजपशी जवळीक करणे ही सुद्धा चूक झाली असून उमेदवारांनी याबाबत नाराजी देखील बोलून दाखवल्याचे समजते आहे.
🔴आज राज ठाकरेंनी मुंबईमधील निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीमध्ये पराभूत उमेदवारांचं म्हणणं ऐकून घेतलं. या बैठकीमध्ये ईव्हीएमसंदर्भातील काही तक्रारी पराभूत उमेदवारांनी राज ठाकरेंकडे केल्या. तसेच भाजपाबरोबरची जवळीक आपल्याला फायद्याची ठरलेली नाही, असं पराभूत उमेदवारांनी राज ठाकरेंना सांगितलं आहे. राज ठाकरेंनी मुंबई आणि उपनगरांमधून एकूण 42 उमेदवार उभे केले होते. मात्र एकही उमेदवार जिंकून आला नाही. इतकेच काय तर स्वत: राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे सुद्धा दादर-माहिम मतदारसंघातून तिसऱ्या स्थानी राहत पराभूत झाले. पक्षाचा एकही आमदार निवडून आलेला नाही. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आज महत्त्वाची बैठक बोलावली होती. राज ठाकरेंनी या बैठकीला मुंबई आणि परिसरातील पराभूत उमेदवारांना बोलावलं होतं. नेमका पराभव झाला तो कशामुळे झाला याची चाचपणी राज ठाकरेंनी या बैठकीमध्ये केली.

🛑मनसेच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत होता, सभांना गर्दी होत होती मग त्याचं रुपांतर मतांमध्ये का झालं नाही? यावर या बैठकीत चर्चा झाली. किमान चार ते पाच जण निवडून येतील अशी अपेक्षा मनसेला होती. मात्र 138 उमेदवार उभे करुन एकही उमेदवार निवडून आला नाही. यावेळेस बैठकीमधील पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात आली. लोकसभा निवडणुकीला भाजपाशी जवळीक करत बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभेला भाजपाशी जवळीक करणं फायद्याचं ठरलेलं नाही असं पराभूत उमेदवारांनी राज ठाकरेंशी बोलताना कळवलं. या सगळ्या गोष्टींची नाराजी उमेदवारांनी व्यक्त केली आहे. या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी कोणतही मार्गदर्शन केलं नाही. त्यांनी केवळ पराभूत उमेदवारांना काय वाटतं हे जाणून घेतलं. आता राज ठाकरे यानंतर काय बोलणार, प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार का? हे अजून गुलदस्त्यातच आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.