Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्ररस्ते विकास🟥रस्ता नसल्यानं पाच महिन्यांच्या गर्भवतीला झोळीतून दवाखान्यात नेलं.- वेळेत पोहोचता आले...

रस्ते विकास🟥रस्ता नसल्यानं पाच महिन्यांच्या गर्भवतीला झोळीतून दवाखान्यात नेलं.- वेळेत पोहोचता आले नसल्याने बाळ पोटातच दगावले.🟥राज्यात थंडी वाढली.- शेकोट्या पेटू लागल्या.

💥रस्ते विकास
🟥रस्ता नसल्यानं पाच महिन्यांच्या गर्भवतीला झोळीतून दवाखान्यात नेलं.- वेळेत पोहोचता आले नसल्याने बाळ पोटातच दगावले.
🟥राज्यात थंडी वाढली.- शेकोट्या पेटू लागल्या.

नंदुरबार :- प्रतिनिधी.

Oplus_131072

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. नेत्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी अनेक आश्वासनं आणि घोषणा केल्या. मात्र, गेल्या अनेक वर्षात पायाभूत सुविधांचा विकास न झाल्याने एका महिलेचा गर्भपात झाला आहे. ही घटना नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात घडली आहे. येथे एका महिलेला पाच महिन्यातच प्रसूतिकळा सुरू झाल्या. मात्र, रस्ता नसल्याने बांबूची झोळी करून तिला तिच्या नातेवाइकांनी दवाखान्यात नेले. मात्र, वेळेत दवाखान्यात पोहोचता आले नसल्याने तिचे बाळ पोटातच दगावले. त्यामुळे या घटनेला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.


🔴नंदुरबार जिल्ह्यातील पिंपळखुटा ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या वेहगीच्या बारीपाडामधील एका गर्भवती महिलेच्या अचानक पोटात दुखू लागले. तिला प्रसूती वेदना होऊ लागल्या. मात्र, तिच्या पाड्यावर रस्ताच नसल्याने तिच्या नातेवाइकांनी बांबूची झोळी करून या महिलेला तब्बल साडेआठ किलोमीटर पर्यंत मुख्य रस्त्यावर आणले. मात्र, या भागात रुग्णवाहिकाही देखील नसल्याने एका खासगी वाहनातून या माहीलेला पिंपळखुटाच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, खराब रस्ता असल्याने एका पाणी साचलेल्या भागात या महिलेची गाडी अडकून पडली.

Oplus_131072


🟥हे वाहन यातून बाहेर काढण्यासाठी मोठा वेळ गेला. यामुळे वेळेत महिला दवाखान्यात न पोहोचल्याने या महीलेचा गर्भपात झाला. नंदुरबार जिल्ह्यात आजही अनेक गावे ही मुख्यरस्त्याला जोडली गेली नाही. अनेक ठिकाणी रस्ते नसल्याने त्यांना पायपीट करावी लागते. तर जे रस्ते आहेत ते देखील नादुरुस्त आहेत. या पाड्याला ग्रामपंचायत मातीचा रस्ता करून देत असते. मात्र, पावसाळ्यात हा रस्ता वाहून जातो. त्यामुळे पावसाळा व हिवाळ्यात रस्त्याअभावी येथील ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन जीवघेणा प्रवास करण्याची वेळ दरवर्षी येते. महिलेचा गर्भपात झाल्याने महिला मोठ्या मानसिक धक्क्यात आहे. तिला म्हणत पिंपळखुटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचा गर्भपात झाला असला, तरी या महिलेची प्रकृती चांगली असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.

🟥राज्यात थंडी वाढली.- शेकोट्या पेटू लागल्या

मुंबई :- प्रतिनिधी

उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्याच्या बहुतेक भागात किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे थंडीत वाढ झाली आहे. सोमवारी नगर येथे राज्यात सर्वांत कमी १२.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज असून, राज्यात किमान तापमान १३ ते १५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
🟪हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिमालयासह उत्तर भारतात पश्चिमी विक्षोप सक्रीय आहे. त्यामुळे श्रीनगरसह लेह, लडाखमध्ये बर्फवृष्टी सुरू झाली आहे. पंजाब, हरियाणासह दिल्ली परिसरात थंडीत वाढ झाली आहे. उत्तर भारत दाट धुक्यांचाही सामना करीत आहे. उत्तरेकडून राज्यात येणाऱ्या याच थंड वाऱ्यांमुळे राज्याच्या बहुतेक भागात किमान तापमानात घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही किमान तापमानात घट झाली आहे. सध्या किमान तापमान सरासरीपेक्षा दोन ते तीन अंश सेल्सिअसने जास्त आहे. उत्तर महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात सोमवारी राज्यात सर्वांत कमी १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यासह जळगावात १३.२, नाशिक १५.२ अंश सेल्सिअस तापमान होते. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये १४.४ आणि परभणीत १४.५ अंश सेल्सिअस तापमान होते.*
🅾️विदर्भातील गोंदियात १४.३, अकोल्यात १५.५, अमरावतीत १५.४, चंद्रपुरात १५.८, नागपूर १५.६, आणि वर्ध्यात १५.६ अशं सेल्सिअसवर पारा होता. मध्य महाराष्ट्रात पुण्यात पुणे १४.५, सांगली १८.७, कोल्हापूर १९.७ आणि महाबळेश्वरमध्ये १३.४ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. दोन दिवसांपूर्वी दक्षिणेतून आलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ झाली आहे. पुढील काही दिवसांत दक्षिण महाराष्ट्रातही पारा उतरण्याचा अंदाज आहे. दरम्यान, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रवाह कायम असल्यामुळे पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे. राज्यातील किमान तापमान १३ ते १५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. के. सानप यांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.