Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रअजितदादा 'दौलत'ची काळजी तुम्ही करू नका, मी सक्षम.- मानसिंग खोराटे, हलकर्णी कारखाना...

अजितदादा ‘दौलत’ची काळजी तुम्ही करू नका, मी सक्षम.- मानसिंग खोराटे, हलकर्णी कारखाना कार्यस्थळावर पत्रकार परिषद

अजितदादा ‘दौलत’ची काळजी तुम्ही करू नका, मी सक्षम.- मानसिंग खोराटे, हलकर्णी कारखाना कार्यस्थळावर पत्रकार परिषद

चंदगड :- प्रतिनिधी.

विधानसभा निवडणुकीत मला मिळत असलेला प्रतिसाद आणी पाठिंब्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार राजेश पाटील यांनी धसका घेतला आहे. त्यामुळेच दौलत कारखान्याला रिकव्हरीच्या आडून घेरण्याचा त्यांचा डाव आहे. तो जनताच हाणून पाडणार आहे. दौलत चालविण्यासाठी मी सक्षम असून त्याची काळजी कुणीही करण्याची गरज नसल्याचे अथर्व-दौलतचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी सांगितले. कालच्या सभेतून अजितदादा यांनी दौलतच्या रिकव्हारीवरून केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. नेसरी येथील मेळाव्यात केलेल्या आरोपांचे खंडण हलकर्णी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

खोराटे पुढे म्हणाले, अजितदादा यांना साखर कारखानदारीतील संपूर्ण ज्ञान असून देखील त्यांनी दौलतच्या रिकव्हरीचे गौडबंगाल मला सांगावं लागत हे दुर्दैवी आहे. बीहेव्ही मोलॅसिसपासून आम्ही अल्कोहोल बनवितो. त्यावेळी त्यामध्ये साखरेचा काही अंश टाकला जातो. त्यामुळे रिकव्हरी कमी येते. तसेच आमचा दर उच्चतम रिकव्हरीनुसार ठरविला जातो. आणि आम्ही कायमच एफआरफीपेक्षा अधिक दर दिला आहे. आज तुम्ही म्हणताय दौलत कारखाना खाली करा, पण, जेव्हा ९ वर्षे कारखाना बंद होता तेव्हा तुम्ही कुठे गेला होता? तो खाली करण्याची गरज काय, २०१० साली तो खालीच होता, तेव्हा घ्यायचा होता. कारखाना बंद काळात कधी तुम्हाला शेतकरी, कामगार व तोडणी-ओढणी वाहतूकदारांचे हाल दिसले नाहीत का? आता कारखाना सुरळीत सुरू असून भागातील शेतकरी, वाहतूकदार, कामगार व कारखान्यावर अवलंबून सर्व घटक सूखी असताना तुम्हाला पोटशूळ आलंय. विधानसभेला तुमचे उमेदवार उभे आहेत म्हणून आज तुम्हाला दौलत आठवली का? असा सवाल उपस्थित करत तुम्ही कारखान्याची काळजी करायची गरज नाही तो चालिविण्यासाठी समर्थ असल्याचे खोराटे यांनी स्पष्ट केले.

चौकट

  • जनताच निवडणुकीत उत्तर देईल

राजेश पाटील यांची सत्तेची भूक वाढत चालली त्याच जिवावर त्यांना दौलत काबीज करायची आहे आणि त्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. पण शेतकरी, कामगार व सभासद हे खपवून घेणार नाहीत. ही जनताच त्यांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवेल असा इशारा अँड. संतोष मळविकर यांनी दिला. यावेळी बी. एम. पाटील, राजवर्धन शिंदे, भरमू जाधव, शावेर फर्नांडिस, बाबूराव पाटील उपस्थित होते.

  • अजितदादा पवार यांनी सिध्द केलं…

अजूनसुद्धा दौलतला राजकारणात ओढलं जात आहे. तुम्ही राजकारणात कशावरही आरोप करा, पण दौलत कारखाना व्यवस्थित चालला आहे, त्याला राजकारणात आणू नका. आज अजितदादा यांनी यावर बोलून सिद्ध केलं आहे की, पूर्वी जे आमदारांनी कारखान्याचा गाळप परवाना रद्द करण्याचे पत्र दिले होते, त्यावरून त्यात अजित पवार यांचा सहभाग होता का हे जवळपास सिद्ध झालं आहे. अम्ही सरळमार्गी असून कारखाना सुरळीत सुरू आहे आता त्याकडे वाकड्या नजरेने पाहू नका. त्यामुळे अजितदादा असुदे अथवा त्यांना सल्ला देणारे कुणीही त्यांनी विचार करून आरोप करावा. प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला आणि कारखाना चालवायला मी सक्षम आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.