Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्र" हंगाम 2024-25 साठी "शाहू " कागल चे अकरा लाख मे. टन...

” हंगाम 2024-25 साठी “शाहू ” कागल चे अकरा लाख मे. टन ऊस गळीताचे उद्दिष्ट.- ४५ व्या गळीत हंगामाचा विधिवत शुभारंभ

” हंगाम 2024-25 साठी “शाहू ” कागल चे अकरा लाख मे. टन ऊस गळीताचे उद्दिष्ट.- ४५ व्या गळीत हंगामाचा विधिवत शुभारंभ

कागल,प्रतिनिधी

येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या ४५ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे ,व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक कर्नाटकचे ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, सर्व संचालक, संचालिका व कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते
गव्हणीत विधिवत उसाची मोळी टाकून करणेत आला.

शाहू साखर कारखान्याने या गळीत हंगामामध्ये अकरा लाख मे. टन ऊस गळीताचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते पूर्ण करण्यासाठी सभासद शेतकऱ्यांनी उसाची इतर ठिकाणी विल्हेवाट न करता 100% ऊस कारखान्यास गळीतास पाठवून सहकार्य करावे. असे आवाहन व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले. यावेळी,सभासद अधिकारी कर्मचारी हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी गव्हाण पूजा कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री व कारखान्याचे ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. आशाराणी पाटील,सत्यनारायण पूजा प्रताप पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी संचालीका सौ. रेखाताई पाटील तर काटा पूजन संचालक शिवाजीराव पाटील व सौ. आनंदी पाटील यांच्या हस्ते विधीवत संपन्न झाली. स्वागत व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे यांनी केले. संचालक डाॕ.डी.एस.पाटील यांनी आभार मानले.

चौकट

“शाहू” च्या वाटचालीची पुढच्या दहा वर्षाची ब्ल्यू प्रिंट तयार

स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्यापासून शाहूमध्ये साखर कारखानदारीत होत असलेले बदल स्विकारण्यासह भविष्याचा वेध घेऊन नियोजन करण्याची परंपरा व्यवस्थापनाने जोपासली आहे.त्यानुसार पुढील दहा वर्षात साखर उद्योग, सहकारी साखर कारखानदारी यांच्यासमोर कोणती आव्हाने असतील व त्याला आपण कशा पद्धतीने सामोरे जाऊ याच्यासह कारखान्याच्या ऊस गाळप, इथेनॉल निर्मिती व इतर नवीन उपपदार्थ निर्मिती अशा पुढील दहा वर्षाच्या वाटचालीची ब्ल्यू प्रिंट तयार आहे. अशी माहिती श्री.घाटगे यांनी यावेळी दिली. त्याला उपस्थित सभासद शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांच्या गजरांनिशी दाद दिली.

छायाचित्र – कागल येथे श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या ४५व्या गळीत हंगामाचा शुभारंभ गव्हाणी मध्ये ऊस मोळी टाकून करताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे,व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे,ज्येष्ट संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, सर्व संचालक व कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.