चंदगड विधानसभा.- महाविकास आघाडी उमेदवार डॉ.नंदाताई बाभूळकर यांच्या प्रचारार्थ महागांव येथे विराट सभा संपन्न.
( नंदाताईंना विजय करून पवार साहेबांचे हात बळकट करा. खास. अमोल कोल्हे.)
महागाव.- प्रतिनिधी.

खासदार डॉ.अमोल कोल्हे: नंदाताई बाभूळकरांच्या विजयाची गॅरंटी देणारी ही सभा आहे. वसा आणि वारसा सांगणाऱ्या नंदाताई बाभूळकर यांना विजयी करून पवार साहेबांचे हात बळकट करावे असे आवाहन केले.
नेते, मंत्री विकले जातात हे पहावयास मिळाले. शरद पवार यांनी अनेकांना सत्ता दिल्या मात्र कांही जणं भाजपच्या वळचणीवर जावून बसले. वयाच्या ८० वर्षीही पवार साहेब सक्रिय आहेत त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची वेळ आहे. त्यांचे हात बळकट करा. आज दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या करत आहेत हे पाप महायुती सरकारचे आहे.महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महिलांना प्रती महिना ३ हजार व स्वावलंबन बनविणार असल्याचे सांगितले.
डॉ.नंदाताई बाभूळकर: मतदार संघात उत्साहाचे वातावरण आहे.चांगला प्रतिसाद मिळत आहे.ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतली आहे त्यामुळे विजयाची चिंता नाही.
शेतकऱ्यांच्या विरोधातील हे सरकार आहे.आपल्या हक्काचे २ लाख रोजगार गुजरातला नेले.अत्याचार, गाडीने चिरडणाऱ्यांना पाठिशी घालणारे हे सरकार आहे.ईडीची भिती दाखवत होलसेलने आमदार विकले गेले.लोकशाहीचा बाजार या मंडळींनी मांडला आहे.

१६०० कोटीचा विकास कोठेही दिसत नाही.विकास कुणाचा झाला आहे हे जनता ओळखून आहे.एव्हीएच चे आसमानी संकट होते त्यावेळी जनतेचा कळवळा दाखवणारे कुठे होते? राष्ट्रवादीने निवडून दिले त्या शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला.मला ही गद्दारी गाडायला पाठविले आहे.चंदगड मध्ये कांहीजण दडपशाही व गुंडगिरी करत आहेत.हे बंद झाले नाही तर मी ताईगिरी दाखवून देईन असा इशारा दिला.

यावेळी किसनराव कुराडे, अखलाक मुजावर,स्वाती कोरी, सुनिल शिंत्रे,विजय देवणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास माजी आम.संध्याताई कुपेकर,बाळ कुपेकर ,रामराजे कुपेकर, विष्णू केसरकर, मुकुंद देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.