७३ वर्षात मतदारसंघात जी कामे झाली नाहीत ती १४ महिन्यात झाली.- नाम. हसन मुश्रीफ
( मडिलगेत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ प्रचार सभा संपन्न. )
आजरा.- प्रतिनिधी.

कागल विधानसभा मतदारसंघात मागील ७३ वर्षात जी विकास कामे झाली नाहीत ती मागील १४ वर्षात झाली. या पुढील विकासाची चिंता न करता येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्य द्या.. यापेक्षाही चांगली व अधिक काम करेन मडिलगे ता. आजरा येथील प्रचार सभेत ना. हसन मुश्रीफ बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक दीपक देसाई यांनी केले. पुढे बोलताना ना. मुश्रीफ म्हणाले महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हणजे सावत्र भावाने लाडक्या बहिणी योजना बंद व्हावी म्हणून न्यायालयात दात मागितली. यापूर्वीच आम्ही पुढील तीन हप्ते बहिणीच्या खात्यावर पाठवले होते. अनेक योजना बंद पडण्याचे काम विरोधकांनी यांनी केले आहे. मागील अनेक वर्षापासून सेवा करण्याचे काम केले आहे येणारा माणूस कोणत्या गटाचा आहे कोणत्या जाती धर्माचा आहे हे कधीच पाहिले नाही नाराज न करता प्रत्येक व्यक्तीला काम करून परत पाठवले आहे. आपण अभ्यासपूर्वक अभ्यास करून माझ्या कामाला समर्थन द्या व कुटुंबातील सर्वांचं मतदान घड्याळाचे न्यारा द्या व प्रचंड मताने विजय करा असं बोलताना मुश्रीफ म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते विजय काळे म्हणाले समरजीत घाटगे यांना अनेक वर्षापासून शाश्वत विकास करायचा आहे. अनेक व्यवसाय आणायचे आहेत. पण त्यांना साधी पिठाची गिरणी मंजूर करून आणता आली नाही. व ७०० कोटीचा विकास करणाऱ्या मुश्रीफ साहेबांच्या वर आरोप करतात विक्रमसिंह राजे यांचा शाहू दूध संघ बंद पाडून ३२ कोटीचा निधी आणला पैसे काय केले व पंजाबच्या सिंग या व्यक्तीला व्यवसाय विकला व ६४ लाखाचे कर्ज दाखवले मुश्रीफ साहेब लोकनेता आहेत हे सांगण्यासाठी समरजीत घटगेच्या प्रमाणपत्राची गरज आपण या मतदारसंघातून आपल्या गावातून विजयाचा षटकार स्टेडियमच्या बाहेर मारावा.. पुन्हा एकदा आमदार करून विधानसभेत पाठवावे असे श्री बोलताना काळे म्हणाले.
यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शितल फराकटे म्हणाल्या. पारदर्शक कारभार करून विकासाची पुस्तिका काढून आपल्यासमोर सादर केली आहे पण ही लढाई बरोबरच्या माणसासोबत पाहिजे होती. जो साहेबांचा पाय हलवू शकत नाही फुकलं तर उडून जाईल असा उमेदवार समोर आहे तो बरोबरीचा नाही. स्वाती कोरीच्या भाषणाचा निषेध करत निस्ता न पळणाऱ्यांनी आम्हाला निष्ठा शिकवायची नाही असे सौ फराकटे म्हणाल्या.

यावेळी प्राध्यापक मधुकर पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, मडिलगे येथील सरपंच बापू निऊगरे, माजी उपसभापती दीपक देसाई, माजी सभापती भिकाजी जी गुरव, माजी सरपंच शिवाजी गुरव, हनुमान समूहाचे अध्यक्ष के. व्ही. येसणे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करत घड्याळ चिन्हावर बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन यावेळी केले.
या प्रचार सभेला वसंतराव धुरे, शिरीष देसाई, मारुती घोरपडे, अनिकेत चराटी, संदीप पाटील, आनंद घाटगे, घोरपडे साखर कारखान्याचे गावातील सर्व कर्मचारी, गटाचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, भावेश्वरी समूह, हनुमान समूह, सर्व संचालक गावातील ज्येष्ठ नागरिक आजी माजी सैनिक संघटना सर्व सदस्य, महिला, नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुशांत गुरव केले तर आभार अनिकेत कवळेकर यांनी मांनले..
