🛑अख्ख घाटगे कुटुंबच राजे समरजितसिंहांच्या प्रचारात.
:- गावागावातील महिला, शेतकरी, तरुणाईचा यंदा परिवर्तनाचा निर्धार – वाडी वस्तीवरही उत्स्फूर्त प्रतिसाद
कागल / प्रतिनिधी.

लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभूमी,कर्मभूमी म्हणून कागलची ओळख आहे. शाहुंच्या या भूमीत सध्या विधानसभेच्या निवडणुकीची मोठी रणधुमाळी सुरू आहे. शाहूंच्या रक्ताचे थेट वारसदार असलेले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारासाठी दस्तूरखुद्द त्यांच्या कुटुंबीयांचा प्रचारातील झंझावात हा तालुक्यातील मतदारांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी बनलेला आहे. यामध्ये राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे, राजे विरेंद्रसिंह घाटगे, राजे अखिलेशसिंह घाटगे, सौ.श्रेयादेवी घाटगे, यश घाटगे हे आघाडीवर असल्याचे प्रकर्षाने निदर्शनास येत आहे. त्यामुळे राजे समरजितसिंहांच्या विजयासाठी अख्खं घाटगे कुटुंबच दमदार प्रचारात रमलं असल्याच्या भावना मतदार संघातील जनतेतून व्यक्त केल्या जात आहेत. विशेष म्हणजे घाटगे कुटुंबियांच्या या प्रचारात महिला, शेतकरी, युवक, युवती, अबालवृद्ध हे प्रचाराच्या केंद्रस्थानी असून त्यांचा मिळत असलेला प्रतिसाद हा उत्स्फूर्त आहे.
शाहू ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजे विक्रमसिंह घाटगे यांनी शाहू कारखान्याच्या माध्यमातून जनतेचा उंचावलेला आर्थिक स्थर तसेच गेल्या नऊ वर्षांपासून समरजितसिंह घाटगे यांनी विविध विकासकामांच्या माध्यमातून तालुक्यात केलेली शाश्वत विकासकामे आणि मतदारसंघाबाबतचे त्यांचे व्हिजन दारोदारी जाऊन मतदारांना पटवून सांगत आहेत.
तसेच राजमाता जिजाऊ महिला समितीच्या वतीने गेली नव वर्षे महिलांना स्वावलंबी बनवणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य शिबीर घेणे, महिला व युवतींना प्रशिक्षण देणे तसेच विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचे काम सौ.नवोदिता घाटगे यांनी केले आहे. गेली नऊ वर्षे त्यांनी केलेले कार्य आणि ठेवलेला संपर्क पाहता सर्वसामान्यांच्या मध्ये एक भावनिक नाते निर्माण झाले आहेत. त्या राजघरातील असून सुद्धा सर्वसामान्यांना त्या आपल्या कुटुंबातील सदस्य असल्यासारख्या वाटततात. त्यामुळे त्यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सध्या सर्वत्रच सुगीचे दिवस असल्याने माणसं आपापल्या शेतीच्या कामांमध्ये व्यस्त आहेत. याची जाणीव आणि भान ठेवून घाटगे कुटुंबीय विधानसभा मतदारसंघ हा आपले कुटुंब मानत असल्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या प्रत्यक्षात वाड्या-वस्त्यांवर, शेतात तसेच गल्लीबोळात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. घाटगे कुटुंबीयांच्या या गाठीभेटींमध्ये समाजातील सर्वच स्तरातील जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून ” यंदा परिवर्तन करायचंय” अशा भावना मतदारातून मोठ्या प्रमाणात ऐकावयास मिळत आहेत..

चौकट ————-
समरजितराजे कुटुंबातील सदस्य….
यावेळी पिंपळगाव खुर्द गावातील पंचायत समितीच्या माजी सदस्य उल्का तेलवेकर म्हणाल्या समरजितराजे आमच्या कुटुंबियातील एक सदस्य आहेत. उच्चशिक्षित आणि भ्रष्टाचाराचा एकही डाग त्यांना लागलेला नाही.तसेच समाज उभारणीचे त्यांचे स्वप्नही आदर्शवत आहे. माता भगिनी, आबालवृद्धांचा मान-सन्मान हा तर त्यांच्यावर झालेला संस्कारच आहे. त्यामुळे अत्यंत पारदर्शक नेतृत्व आणि कर्तृत्व असलेल्या आमच्या राजेंना या विधानसभेच्या निवडणुकीत तालुक्यातील तमाम जनता नक्की पाठवेल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
मागच्या दाराने पळून गेला म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार केल्याचे सिद्धच केले.. ( समरजितसिंह घाटगे.)
{ कागलमध्ये कोपरा सभांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद.}
कागल,प्रतिनिधी.
साहेबांच्या यांच्या घरावरील ईडीच्या धाडीवेळी नागरिक त्यांच्या दारासमोर या अधिकाऱ्यांच्या समोर समर्थनात उभे राहिले होते. मात्र पालकमंत्र्यांनी पाठीमागच्या दाराने पळून गेले. याचाच अर्थ त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे स्वतःच सिद्ध केले. अशी घणाघाती टीका महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी केली.
कागल शहरातील विक्रमनगर, शाहूनगर, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक व मुजावर गल्ली या ठिकाणी झालेल्या कोपरा सभांवेळी ते बोलत होते.
यावेळी आनंदा माणगावकर, रोहित माणगावकर, देवदास मोरे यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. घाटगे पुढे म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांची जनक भूमी असलेल्या कागलची ओळख पालकमंत्र्यांच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीमुळे चुकीची निर्माण झाली आहे. कागल गडहिंग्लज उत्तूर विभागामध्ये शाश्वत काम तर नाहीच शिवाय नियोजनबद्ध काम केलेले नाही.रस्ते गटर्स व प्लॉटिंग करणारे कार्यकर्त्यांचे संरक्षण, यामध्येच त्यांनी विशेष लक्ष घातले. कागलसारख्या शहरात वैद्यकीय शिक्षण मंत्री असलेल्या मंत्र्यांना 500 बेडचे हॉस्पिटल आणले नाही?. सुदृढ व स्वावलंबी पिढी घडवण्याऐवजी त्यांना बिघडवीण्याचे काम पाकीट संस्कृतीतून त्यांनी केले आहे. यापुढे जाऊन त्यांच्या गल्लीत गांजा पकडला जातो. हे छत्रपती शाहू महाराजांच्या कागलचे मोठे दुर्दैव आहे. छत्रपती शाहू महाराजांचे आदर्श कागल घडविण्यासाठी गट तट जात पात सगळे बाजूला ठेवून एकत्र येऊन बदल घडवूया.
मोडक्या स्कूटरवरून फिरणाऱ्या पालकमंत्र्यांकडे कोट्यावधींची माया आली कुठून?.
राजेंद्र जाधव म्हणाले 40 वर्षांपूर्वी पालकमंत्री वाय डी माने यांच्या लंब्रेडा स्कूटरवरून फिरायचे. त्यांच्याकडे स्वतःची गाडीही नव्हती. मात्र आज त्यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची माया असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना दाखवले आहे. आत्ता त्यांचेकडे
हजारो कोटी रुपयांची मालमत्ता आली कुठून? याशिवाय त्यांचे नातेवाईकांच्या नावावर असलेली हजारो कोटी रुपयांची मालमत्ता आहे हे गोड बंगाल काय ? स्वर्गीय राजे गटाचे माजी नगरसेवक सुभाष कालेकर यांचे उदाहरण देताना श्री जाधव म्हणाले 25 वर्ष पाहतो कालेकर आहे तसेच आहेत, प्रामाणिकपणे कष्ट करून खातात. उलट मुश्रीफ साहेब यांचे आठ दहा वर्षांपूर्वी झालेले नगरसेवक पाहिले तर काय ते बंगले? काय त्या गाड्या? काय त्यांचा रुबाब? काय ती त्यांची प्रॉपर्टी अस म्हणण्याची वेळ आली आहे
साहेबांचा यांचा डायमंड कॉन्ट्रॅक्टर.
रमीज मुजावर म्हणाले, मुश्रीफ साहेबांनी ज्या चार ठेकेदारांना मोठे केले त्यामधील एक कागल शहरातील असून तो डायमंड कॉन्ट्रॅक्टर म्हणून ओळखला जातो.शहरातील संपूर्ण कामांचे नियोजन तो करतो.मग मुश्रीफ साहेब यांच्या इतर कार्यकर्त्यांनी फक्त झेंडे लावायचे सतरंज्या उचलायचेच काम करायचे का ? मुस्लिम बांधवानो ही निवडणूक विचाराची आहे. आम्हा मुस्लिम बांधवांसाठी मुश्रीफ साहेबांनी काय केले हे जरा तपासा. मुश्रीफ साहेब यांनी 25 वर्षात मुस्लिम बांधवांसाठी न केलेल्या कामाचा पाढाच श्री मुजावर यांनी सभेत वाचला
शाहूंचे नाव घेता मग त्यांचा वंशज का चालत नाही?
माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज असलेले समरजितसिंह घाटगे सीए सारखे उच्चशिक्षित आहेत.शाहू ग्रुपची धुरा त्यांनी यशस्वी सांभाळली आहे. या विभागाच्या शाश्वत विकासासाठी ते रात्रंदिवस झटत आहेत. शाहू फुले आंबेडकर यांचे नाव घेणाऱ्या विरोधकांना शाहूंचा हा वंशज आमदार म्हणून का चालत नाही?
यावेळी अखिलेशराजे घाटगे, कागलचे माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, सुरेश कुराडे, शिवानंद माळी, सागर कोंडेकर,हौसाबाई धुळे, दादू गुरव,दगडू चौगुले, दिलीप पाटील,प्रमोद हर्षवर्धन, संकेत भोसले,हिदायत नायकवडी, गजानन माने,विजया निंबाळकर,अभिजीत कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
या कोपरासभांना राजे वीरेंद्रसिंह घाटगे,बाॕबी माने,सतीश पाटील,नंदू माळकर,आनंदा पसारे,आनंदी मोकाशी,दिपाली भुरले,विवेक कुलकर्णी,दीपक मगर,उमेश सावंत,नम्रता कुलकर्णी,दीपाली घोरपडे,विद्या गिरी आदी उपस्थित होते.