सतीश जारकीहोळी (पालकमंत्री)- प्रियांका सतीश जारकीहोळी (खासदार ) यांचा ..नंदाताईना जाहीर पाठिंबा.
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.
चंदगड विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार नंदाताई उर्फ नंदिनी बाभुळकर (कुपेकर) यांना
सतीश जारकीहोळी (पालकमंत्री बेळगांव, सार्वजनिक बांधकाम मंत्री, कर्नाटक राज्य) व प्रियांका सतीश जारकीहोळी (खासदार, चिक्कोडी लोकसभा मतदारसंघ) यांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार कुपेकर- बाभुळकर नंदाताई उर्फ नंदिनी यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी कुपेकर परिवार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीने त्याबद्दल मनःपूर्वक आभार.
चंदगड विधानसभेत महाविकास आघाडीच्या एकतेचा विजय निश्चित आहे! परिवर्तनाचा ध्वज घेऊन आम्ही नव्या युगाच्या विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. तुमचा प्रत्येक पाठिंबा महत्त्वाचा आहे आणि परिवर्तनाच्या या विजयात हातभार ठरेल! अशी मतं उमेदवारांनी व्यक्त केले..