खोराटे कामाचा माणूस… जनता आशेने बघतेय, एकदा संधी द्या.- जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांचे आवाहन; गडहिंग्लज पूर्व भागात दौरा
गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

मानसिंग खोराटे हे असे उमेदवार आहेत, ज्यांनी मतदारसंघात स्वतःच्या बळावर काम करून तुमच्यासमोर मतं मागायला आलेत. त्यांच्याकडे चंदगड मतदारसंघाची जनता आशेने बघत आहे. जी सुरज्याची संकल्पना घेवून आम्ही निघालो आहोत त्याला पुढं नेण्याचं काम आमचे उमेदवार मानसिंग खोराटे करतील, आजपर्यंत चंदगड मतदारसंघातील जनतेनं बरे – वाईट अनुभव घेतले आहेत, आता परिवर्तन करण्याची वेळ आली आहे, त्यामुळे लोकांनी त्यांना निवडून द्यावं असं आवाहन जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्वेसर्वा विनय कोरे (सावकर) यांनी केले. चंदगड मतदारसंघाच्या गडहिंग्लज पूर्व भागात प्रचार दौरा काढला, त्यावेळी ते माध्याळ येथे बोलत होते.
यावेळी काळभैरव मंदिर डोंगर, माध्याळ, हसुरचंपू, हेबाळ, दुंडगा, जरळी, मुगळी, नूल, खणदाळ, बसर्गे, हलकर्णी, तेरणी, नरेवाडी, हिडदुग्गी, हसूर सासगिरी, हसुरवाडी, भडगाव असा प्रचार दौरा काढण्यात आला.या दौऱ्यात बसवराज आरबोळे,…. आदी उपस्थित होते.

- वातावरण चांगलं असून कुठेच अडचण नाही : कोरे
यावेळी कोरे म्हणाले, चंदगड मतदारसंघात खूप चांगलं वातावरण आहे. कुठेही आम्हाला जनसुराज्य पक्षाला अडचण वाटत नाही. अम्ही नक्की चांगला विजय मिळवू. तुम्ही मतदारसंघाच्या चांगल्या भविष्यासाठी, इथल्या लोकांच्या रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सोयी यासाठी तुम्ही खोराटे यांना विधानसभेत पाठवा. ते नक्कीच चांगलं काम करून या मतदारसंघाचा कायापालट करतील असा विश्वास कोरे यांनी यावेळी दिला.
माझ्याकडे सुरुवातीला जरी मुठभर लोकं असेल तरी ते माझे सेनापती होते. आज जनसुराज्य शक्ती पक्ष, माझे कामगार, तोडणी वाहतूकदार यांची यंत्रणा पाहिली तर आज आमच्या मागे एक सेना उभी राहिली आहे. त्यामुळे या सर्वांच्या पाठिंब्यावर ही लढाई नक्की जिंकू असा विश्वास मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केला.
- कुठेच कमी पडणार नाही, विजय आपलाच आहे : खोराटे
आज गडहिंग्लज भागात आपली यंत्रणा चांगली राबत आहे. चंदगड भागात कामगार, वाहतूकदार, शेतकरी आणि कार्यकर्ते यांची फौज उभी आहे. त्यामध्यामातून कुठेच कमी पडणार नाही. आजरा तर माझी जन्मभूमी आहे, त्यामुळे सर्वच विभागात आपण चांगल्या पद्धतीने यंत्रणा लावली आहे. आपण कुठेच मागे राहणार नाही. तरी या विभागातील विकासाला साथ देण्यासाठी बदल घडवूया. बदल हवा तर आमदार नवा ही संकल्पना घेऊन पुढे जाऊयात, तुम्ही मला आशीर्वाद द्या असं आवाहन खोराटे यांनी केले.
खोराटे यांच्यासाठी रात्रीचा दिवस करू : बसवराज आरबोळे
जनता मानसिंग खोराटे यांच्या पाठीशी आहे. गडहिंग्लज भागात खूप सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे पूर्व भाग असो व संपूर्ण तालुका जन सुराज्य शक्ती पक्षाची ताकद आणि खोराटे यांची विकासाची प्रतिमा पाहता विजय आपलाच आहे असा विश्वास सरपंच संघटनेचे अध्यक्ष बसवराज आरबोळे यांनी व्यक्त केला. तरी सर्वांनी शेवटच्या टप्प्यात जोमाने कामाला लागून खोराटे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस करू असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबुराव मदकरी (माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, गडहिंग्लज), तम्माना पाटील (मा.चेअरमन, गडहिंग्लज तालुका खरेदी विक्री संघ), आप्पा साहेब पाटील (मा. सभापती,पंचायत समिती गडहिंग्लज), रमेश आरबोळे (मा. सरपंच, मुंगळी), रमेश रिंगणे (मा. उपनगराध्यक्ष, गडहिंग्लज)