🛑गडहिंग्लज शहरातील मोक्याच्या जागा टक्केवारीतील दलालांना विकण्याचा घातला घाट……. स्वाती कोरी यांची घणाघाती टीका…
🛑विरोधकांच्या भुलथापा, अमिषे, दडपशाहीला बळी पडू नका :- दत्तोपंत वालावलकर
( मंत्र्यांनी केवळ फक्त कोणाचे हित जोपासले अभ्यास करा :- राजे समरजितसिंह घाटगे .)
कापशी / प्रतिनिधी.

विरोधक सत्तेचा दुरुपयोग करून हे शासकीय योजनेचे लाभ घेणारे लाभार्थी निवडणुकीत जर त्यांच्या विरोधात जात असतील तर त्यांचे शासकीय योजनेतून मिळणारे लाभ तत्काळ बंद करण्याच्या धमक्या देत आहेत. खरं तर ही लोकशाहीची थट्टाच म्हणावी लागेल. त्यांच्या या दडपशाही आणि झुंडशाहीमुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानच धोक्यात आल्याचे निदर्शनास येत आहे.त्यामुळे जनसामान्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या या प्रवृत्तीच्या भूलथापा,अमिषे आणि दडपशाहीला बळी पडू नका असे आवाहन पंचायत समितीचे माजी सभापती दत्तोपंत वालावलकर यांनी केले.
तमनाकवाडा (ता.कागल) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच दत्ता चव्हाण होते. श्री.वालावलकर पुढे म्हणाले, पालकमंत्री मुश्रीफ हे जाणीवपूर्वक शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना वेठीस धरत आहेत. समाजात भय आणि भ्रष्टाचाराने तर कळसच गाठलेला आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून पालकमंत्र्यांच्या जोखडात अडकलेल्या आपल्या समाजाला सोडविण्यासाठी आणि शाश्वत विकासाची दूरदृष्टी असलेल्या राजे समरजितसिंह घाटगे यांना निवडून देऊया असे सांगितले. राजे समरजितसिंह घाटगे यावेळी बोलताना म्हणाले, मंत्री महोदय कोल्हापूर येथे अकराशे बेडचे हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मग गेल्या पंचवीस वर्षात ज्या विधानसभा मतदारसंघाने त्यांना सत्ता दिली त्या मतदार संघातील जनतेच्या आरोग्य सुविधांसाठी तालुक्याच्या ठिकाणी पाचशे बेडचे हॉस्पिटल का उभे केले नाही ?असा सवाल उपस्थित करून केवळ आणि केवळ कंत्राटदारांचे हित जोपासणे एवढेच त्यांचे मनसुबे आहेत. त्यामुळे जनतेने आता वेळीच सावध होण्याची गरज आहे.आपल्या सर्वांच्या कुटुंबातील या सदस्याला एक वेळ आमदारकीची संधी द्या, तुम्हा सर्वांचा मान सन्मान जोपासण्यासाठी कोणतीही कमतरता ठेवणार नाही. सागर कोंडेकर , दत्ता चव्हाण,सुरेश चौगले, अण्णाप्पा तिप्पे, जयदेव चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मोहन मोरे,भिकाजी तिप्पे,अण्णाप्पा तिप्पे, आप्पासाहेब तिप्पे, संजय बरकाळे, धोंडीबा तिप्पे, रोहण चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महादेव तिप्पे यांनी आभार मानले…..
चौकट ———
शपथा द्या, भांडी घ्या……
यावेळी बोलताना दिलीप तिप्पे म्हणाले, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्यामुळे मते मिळवण्यासाठी ते वेगवेगळी षडयंत्रे रचत आहेत. आता मागच्या दाराने भांडी वाटपाचा एक अजब फंडा विरोधकांनी सुरू केला आहे. ते घरोघरी सांगताहेत,शपथा द्या,भांडी घ्या. त्यांच्या नेत्यांचे हे संस्कार घराघरात पेरत आहेत.यामुळे लोकशाही धोक्यात आली असून आपल्या मुलाबाळांचे भविष्य घडविण्यासाठी अशा समाजविघातक प्रवृत्तीला मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवा..

🛑गडहिंग्लज शहरातील मोक्याच्या जागा टक्केवारीतील दलालांना विकण्याचा घातला घाट……. स्वाती कोरी यांची घणाघाती टीका… ( मंत्र्यांनी ठेकेदार,कंत्राटदार टोळीला पोसले : समरजितसिंह घाटगे…)
गडहिंग्लज येथील महाविकास आघाडीच्या सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद……
गडहिंग्लज / प्रतिनिधी

शैक्षणिक विद्यापीठ अशी आदर्शवत ओळख असणाऱ्या गडहिंग्लज शहराला मंत्री यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीने बदनाम केले आहे.त्यांच्या फोडाफोडीच्या आणि बेबंदशाही कारभाराला जनता आता कंटाळली आहे.शहरातील अत्यंत मोक्याच्या जागा भू- माफियांना आणि टक्केवारीतील दलालांना विकण्याचा घाट मुश्रीफ यांनी घातला असून अशा भ्रष्ट प्रवृत्तीला गडहिंग्लजवासीय जनता या निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून नक्की धडा शिकवतील अशी घणाघाती टीका जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांनी केली.
महाविकास आघाडीचे उमेदवार राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या.
स्वाती कोरी पुढे म्हणाल्या, हजारो कोटींचा आपला घोटाळा लपविण्यासाठी पालकमंत्री मुश्रीफ यांनी जातीयवादी पक्षाचा आसरा घेतला हे जगजाहीर आहे.राजकारणात यशस्वी होण्यासाठी पैशाच्या बळावर माणसं विकत घ्यायचा हा त्यांचा एककलमी फंडा सुरू आहे.शहरात त्यांची झुंडशाही आणि एकाधिकारशाही फोफावलेली आहे.स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी दिवंगत आम. श्रीपतराव शिंदे यांचा पक्ष फोडण्याचे पाप करत आहात. याची किंमत त्यांना नक्की या निवडणुकीत चुकवावी लागेल.
राजे समरजितसिंह घाटगे यावेळी बोलताना म्हणाले, पंचवीस वर्षे सत्तेत असलेल्या मुश्रीफांच्या मतदारसंघातील जनतेला उपचारांसाठी पुणे-मुंबईला जावे लागते हे त्यांच्या कर्तृत्वाचे अपयशच मानावे लागेल. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या सात हजार कोटींच्या पुस्तकात शिक्षण,आरोग्य या महत्त्वपूर्ण कामांसाठी किती निधी खर्च केला याची आकडेवारी का दिली नाही ?असा सवाल उपस्थित करून त्यांच्या सत्तेची संपूर्ण हयात ही कंत्राटदार,ठेकेदार टोळीला पोसण्यासाठीच व्यतीत केली असल्याचे सांगितले.त्यामुळे आपल्या सर्वांच्या हक्काचा आणि कुटुंबातील या सद्यस्याला विधानसभेत पाठवा.तुम्हा सर्वांना विश्वासात घेऊन काम करेन असा विश्वास व्यक्त केला.
बसवराज आजरी, कुमार पाटील,काशीनाथ देवगौडा, संभाजी भोकरे, सुनील शिंत्रे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवाजीराव खोत, रणजितसिंह पाटील, बाबासाहेब पाटील, ॲड .दिग्विजय कुराडे, रवींद्र घोरपडे, स्वाती खोत, दिलीप माने, बाबासाहेब पाटील खातेदार, प्रतिभा पाटील,अजित पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह कार्यकर्ते,पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत प्रास्ताविक रामदास कुराडे यांनी केले. संपतराव देसाई यांनी आभार मानले…
चौकट ---------------
मंत्र्यांनी जनतेचं काय केलं……अमर चव्हाण.
यावेळी अमर चव्हाण म्हणाले, ज्यांना गडहिंग्लज शहरासह तालुक्याने तीन टर्म आमदार केलं त्या मंत्री महोदयांनी येथील औद्योगिक वसाहतीत एकही मोठी कंपनी आणली नाही. गडहिंग्लज तालुक्यामध्ये जुगाराचे मात्र सात क्लब सुरू आहेत. ते क्लब कोणी आणि कोणासाठी आणले ? हाताला काम नसल्याने हतबल झालेली येथील तरुणाई जुगाराच्या विळख्यात पूर्णपणे अडकत चालली असून याला सर्वस्वी जबाबदार मंत्री आहेत. त्यांच्या अनेक गैरधंद्यांनी समाजस्वास्थ्य बिघडलेले असून येथील जनतेचं त्यांनी वाटोळं करण्याचं काम केलं असल्याचे सांगितले..